भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने मैदानात पाय ठेवताच इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
आतापर्यंत वसिमने रणजी क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिले आहे. वसिमने मुंबईकडून रणजी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो विदर्भाच्या संघात दाखल झाला. विदर्भाच्या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार होता. गेल्या देन्ही हंगामात विदर्भाने जेतेपद पटकावले आहे. या दोन्ही वर्षी तो या संघात होता.
भारतामध्ये दीडशे रणजी करंडक स्पर्धेत सामना खेळणारा वसिम हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी एकाही क्रिकेटपटूला १५० रणजी सामने खेळता आलेले नाहीत. त्यामुळे आज मैदानात पाऊल टाकताच वसिमने दीडशे कसोटी सामने खेळण्याचा इतिहास रचला. यावेळी दोन्ही संघांतील खेळाडूंनी उभे राहून त्याला मानवंदना दिली आणि त्याला शुभेच्छा दिल्या.ॉ