Join us

IND vs SA: टीम इंडियाच्या पराभवानंतर मायकल वॉननं डिवचलं, मग वसीम जाफरनं दिलं जशास तसं प्रत्युत्तर!

India vs South Africa Test Series: यजमान द.आफ्रिकेनं भारतीय संघा विरुद्धची कसोटी मालिका २-१ नं जिंकली आणि भारतीय संघाचं द.आफ्रिकेच्या भूमीत मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच राहिलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 23:12 IST

Open in App

India vs South Africa Test Series: यजमान द.आफ्रिकेनं भारतीय संघा विरुद्धची कसोटी मालिका २-१ नं जिंकली आणि भारतीय संघाचं द.आफ्रिकेच्या भूमीत मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच राहिलं. मालिकेत आधीपासूनच भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानलं जात होतं. भारतीय संघानं पहिली कसोटी जिंकत दमदार सुरुवात देखील केली होती. पण शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये द.आफ्रिकेच्या संघानं जबरदस्त कामगिरी करत भारताला धक्का दिला. 

भारतीय संघाच्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याला टॅग करत डिवचलं. त्यावर वसीम जाफरनं जशास तसं प्रत्युत्तर देत मायकल वॉनला भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची आठवण करुन दिली आहे. 

मायकल वॉननं भारतीय संघाच्या पराभवानंतर एक ट्विट केलं. यात वसीम जाफरला टॅग करत 'मी फक्त माझ्या माहितीसाठी तपासून पाहातोय की तू ठीक आहेस ना?', असं म्हटलं. त्यावर वसीम जाफरनंही मिश्कीलपणे ''सारंकाही ठीक आहे. विसरू नकोस आम्ही अजूनही इंग्लंड विरुद्ध २-१ नं आघाडीवर आहोत'', असं प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय संघानं इंग्लंडचा दौरा केला होता. यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात आली होती. मालिकेत भारतीय संघाकडे २-१ अशी आघाडी आहे. शेवटची कसोटी कोरोनामुळे खेळवता आली नाही. ती आता जुलै २०२२ मध्ये खेळवली जाणार आहे. 

टॅग्स :वासिम जाफरभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App