टॉस म्हणून 'त्याने' चक्क बॅटच उडवली, 141 वर्षांची प्रथा मोडली!

पुरुषांच्या बिग बॅश लीगमध्ये घडलेल्या विचित्र प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:46 PM2018-12-20T14:46:44+5:302018-12-20T14:51:59+5:30

whatsapp join usJoin us
Watch: Big Bash League breaks away from 141-year toss tradition with bat flip | टॉस म्हणून 'त्याने' चक्क बॅटच उडवली, 141 वर्षांची प्रथा मोडली!

टॉस म्हणून 'त्याने' चक्क बॅटच उडवली, 141 वर्षांची प्रथा मोडली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपुरुषांच्या बिग बॅश लीगमध्ये घडलेल्या विचित्र प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधलेऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवर मॅथ्यू हेडनने टॉससाठी बॅट उडवलीअॅडलेड स्ट्रायकर्स संघाने पाच विकेट्सने जिंकला सामना

सिडनी : महिला बिग बॅश लीगमध्ये बुधवारी ग्रेस हॅरीसने विक्रमी खेळी केली. हॅरीसने बिग बॅश लीगमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा पराक्रम केला. ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅरीसने अवघ्या 42 चेंडूंत शतक पूर्ण केले. महिला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील हे दुसरे जलद शतक ठरले. वेस्ट इंडिजच्या डिंड्रा डॉटीनने 2010 च्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत 38 चेंडूंत शतक झळकावले होते. एकिकडे हॅरीसची फटकेबाजीचा उदोउदो होत असताना पुरुषांच्या बिग बॅश लीगमध्ये घडलेल्या विचित्र प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

बिग बॅश लीगमध्ये बुधवारी ब्रिस्बन हिट आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याला टॉस उडवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी टॉससाठी कोणतेही नाणे वापरण्यात आले नव्हते तर चक्क बॅट उडवून टॉस करण्यात आला. या "bat flip" टॉसमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने बाजी मारली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 









ब्रिस्बन हिटने प्रथम फलंदाजी करताना 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात अॅडलेड स्ट्रायकर्सने 19.1 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 147 धावा केल्या. अॅलेक्स करीने 70 धावांची खेळी करताना स्ट्रायकर्सचा विजय निश्चित केला. त्याने 46 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचले. स्ट्रायकर्सच्या रशिद खानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रशिदने 4 षटकांत 19 धावांत 3 विकेट घेतल्या. 
पाहा व्हिडीओ... 


नाणेफेकीत बॅट उडवून या सामन्यात 141 वर्षांची क्रिकेटमधील प्रथा मोडली. 1877 साली पहिल्या कसोटी सामन्यानंतर सुरु असलेली नाणेफेकीची प्रथा बिग बॅश लिगमध्ये मोडली. 

Web Title: Watch: Big Bash League breaks away from 141-year toss tradition with bat flip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.