Join us  

'आमचा संघ पाकिस्तानला पाठवणार नाही...', लाईव्ह शोमध्ये हरभजन सिंग संतापला

पाकिस्तानी शोमध्ये हरभजन सिंगने आपल्याच शैलीत सर्वांची बोलती बंद केली. पाहा व्हिडिओ..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 1:54 PM

Open in App

Harbhajan Singh Statement : गेल्या महिन्यात पार पडलेल्या T-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांना भिडले होते. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा Ind-Pak आमने सामने येणार आहेत. पुढील वर्षी होणारी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या स्पर्धेचे वेळापत्रकही तयार केले आहे. पण, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.

पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताला आपला संघ पाठवण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे, PCB ने 1 मार्च 2025 रोजी लाहोरमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना निश्चित केला आहे, मात्र अद्याप याला ICC आणि BCCI कडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. पण, आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) भारतीय संघ पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे म्हटले आहे. हरभजन पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर सुरू असलेल्या एका लाईव्ह शोमध्ये चांगलाच संतापलेला दिसला. सध्या भज्जीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा video :- 

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवरील लाईव्ह शोमध्ये हरभजन सिंग अँकरवर संतापून म्हणाला, "आमचे खेळाडू पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाहीत, त्यामुळे आम्ही आमचा संघ पाठवणार नाही. तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा, अन्यथा नका खेळू. आम्ही तुमच्यासोबत क्रिकेट खेळल्याशिवाय जगू शकतो. तुम्ही भारतासोबत क्रिकेट खेळल्याशिवाय जगू शकत असाल, तर ते करा," असे स्पष्टपणे भज्जीने म्हटले.

दुबई किंवा श्रीलंकेत सामना होणार?मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत खेळले जाऊ शकतात. सध्या BCCI आणि ICC यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे पीसीबीचे वेळापत्रक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वेळापत्रक तयार केले आहे. पीसीबीच्या वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत खेळवली जाईल. पीसीबीने या स्पर्धेसाठी शेड्युल तयार केला आहे, ज्यानुसार लाहोरमध्ये 7 सामने, रावळपिंडीमध्ये 5 आणि कराचीमध्ये 3 सामने होणार होते. पीसीबीने आपल्या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये 1 मार्च रोजी ठेवला आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपाकिस्तानबीसीसीआयआयसीसीहरभजन सिंगऑफ द फिल्ड