Join us  

Viral Video: पहावं ते नवलंच! विकेट घेतल्यावर भरमैदानात गोलंदाजानं लावलं मास्क, पाहा नक्की काय घडलं?

Haris rauf wicket celebration: पाहा नक्की काय झालं मैदानावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 10:38 AM

Open in App

Haris rauf wicket celebration Viral Video: कोरोना काळातही अनेक देशांमध्ये क्रिकेट (Cricket) लीगचं आयोजन होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी बिग बॅश लीगचं आयोजन करण्यात आलंय. या लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजानं (Pakistani Bowler) विकेट घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला आहे.

पाकिस्तानी गोलंदाज हॅरीस रौफ (Haris Rauf) यानं विकेट घेतल्यानंतर अनोख्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. विकेट घेतल्यानंतर त्यानं हात सॅनिटाईज करण्याचा मेसेज दिला, तसंच त्यानं त्वरित आपल्या खिशातून मास्क काढून परिधान केलं. पिचवर पहिल्यांदाच अशा प्रकारचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं, ज्यात सेलिब्रेट करण्यासह एक संदेशही देण्यात आला. पाकिस्तानच्या हॅरिस रौफनं गेल्या काही कालावधीपासून चांगली कामगिरी केली आहे. बिग बॅश लीगमध्ये तो मेलबर्न स्टार्सकडून खेळतोय. मेलबर्न स्टार्सच्या काही खेळाडूंना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. हॅरीस रौफ सध्या चर्चेचाही विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं त्याला एक भेट दिली होती. एमएस धोनीनं सही केलेली चेन्नई सुपरकिंग्सची जर्सी रौफला भेट देण्यात आली होती. त्यानं स्वत: याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान
Open in App