सिराजच्या गोलंदाजीवर फसला अन् शुबमन गिलवर पुन्हा आली अंगठा धरून बसण्याची वेळ; पण...

नेट्स प्रॅक्टिस वेळी Shubman Gill संदर्भात घडला 'धकधक' वाढवणारा सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:40 IST2024-12-24T13:39:23+5:302024-12-24T13:40:16+5:30

whatsapp join usJoin us
Watch: Mohammed Siraj injures Shubman Gill in nets with lethal delivery ahead of MCG Test | सिराजच्या गोलंदाजीवर फसला अन् शुबमन गिलवर पुन्हा आली अंगठा धरून बसण्याची वेळ; पण...

सिराजच्या गोलंदाजीवर फसला अन् शुबमन गिलवर पुन्हा आली अंगठा धरून बसण्याची वेळ; पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill injury Scare Before Boxing Day Test At Melbourne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणाऱ्या या सामन्याआधी टीम इंडियाच्या सराव सत्रावेळी शुबमन गिलसंदर्भात धकधक वाढवणारा एक सीन पाहायला मिळाला. आघाडीच्या फळीतील प्रमुख फलंदाज असलेला शुबमन गिल नेट्समध्ये सराव करताना त्याला पुन्हा एकदा चेंडू लागला. 

बॉक्सिंग डे आधी शुबमन गिल पुन्हा दुखापत, पण...

चौथ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघ कसून सराव करत आहे. २४ डिसेंबरला भारतीय संघातील प्रिन्स या नावाने ओळखला जाणारा शुबमन गिल नेट्समध्ये उतरुन घाम गाळताना दिसले. पण मोहम्मद सिराजच्या गोलंजीचा सामना करताना एक चेंडू शुबमन गिलच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर लागला. त्यानंतर शुबमन गिलनं सरावच बंद केला. हा सीन बॉक्सिंग डे कसोटीआधी टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारा असाच होता. पण काही वेळातच त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केल्यामुळे मोठा धोका नाही, असे चित्रही दिसून आले. 

पहिल्या कसोटीला दुखापतीमुळे बसावे लागले होते बाकावर

शुबमन गिलच्या हातच्या अंगठ्यावर चेंडू लागल्यावर मोहम्मद सिराज गोलंदाजी सोडून त्याच्याकडे धावला. एवढेच नाही तर फिजिओही तातडीने नेट्समध्ये आले. त्यानंतर काही वेळानं शुबमन गिल पुन्हा बॅटिंगसाठी तयार झाला. त्यामुळे त्याची दुखापत टेन्शन देणारी नाही, हे स्पष्ट झाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुरुवातीच्या पर्थ कसोटी आधी सरावा दरम्यान त्याला अंगठ्यावरच मार लागला होता. परिणामी त्याला पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. त्यामुळेच त्याच्या अंगठ्यावर पुन्हा मार बसल्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारा  सीन क्रिएट झाल्याचे पाहायला मिळाले. पण तो पुन्हा सराव करताना दिसल्यामुळे त्याची दुखापत फार गंभीर नाही, असेच दिसून आले.

तीन डावातील उणीव भरून काढण्याचे चॅलेंज

शुबमन गिलनं अ‍ॅडिलेड कसोटीतून कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यातील दोन्ही डावात त्याने चांगली सुरुवात केली. पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३१ आणि दुसऱ्या डावात त्याच्या भात्यातून २८ धावा आल्या. ब्रिस्बेन गाबा कसोटीत तो अवघ्या एका धावेवर बाद झाला होता. मेलबर्न कसोटी सामन्यात त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे. 

Web Title: Watch: Mohammed Siraj injures Shubman Gill in nets with lethal delivery ahead of MCG Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.