Video : महेंद्रसिंग धोनीच्या ५ वर्षांच्या लेकीची पहिली जाहिरात; वडिलांसोबत जिवाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

सोशल मीडियावर जिवाचाही मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत

By स्वदेश घाणेकर | Published: January 5, 2021 08:46 AM2021-01-05T08:46:13+5:302021-01-05T08:46:35+5:30

whatsapp join usJoin us
Watch: MS Dhoni's daughter Ziva gets first brand endorsement at age of 5, features alongside daddy MSD | Video : महेंद्रसिंग धोनीच्या ५ वर्षांच्या लेकीची पहिली जाहिरात; वडिलांसोबत जिवाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

Video : महेंद्रसिंग धोनीच्या ५ वर्षांच्या लेकीची पहिली जाहिरात; वडिलांसोबत जिवाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी करारबद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही धोनीकडे अनेक कंपन्यांच्या जाहीरातींचे प्रस्ताव येत आहेतच. पण, आता त्याच्यासोबत कन्या जिवा हिचेही जाहीरात क्षेत्रात पदार्पण झाले आहे.  

सोशल मीडियावर जिवाचाही मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. धोनी व साक्षी यांच्यासोबतचे अनेक व्हिडीओ जिवाच्या इंस्टा अकाऊंटवर आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळते. आता ५ वर्षीय जिवानं एक पाऊल पुढे टाकताना जाहीरातीत वडिलांसोबत काम केले आहे. 

कॅडबरी ओरिओ बिस्किट कंपनीनं तिला करारबद्ध केले आहे. त्यांनी सोशल मिडीयावरून ही घोषणा केली आहे.  


 

 क्रिकेटशिवाय धोनीची अनेक क्षेत्रात केलीय गुंतवणूक..
हॉटेल - धोनीची पत्नी साक्षीनं हॉटेल मॅनेजमेंटचा केलं आहे आणि हॉटेल्स इंडस्ट्रीतही धोनीनं गुतवणुक केली आहे. झारखंड येथे कॅप्टन कूल धोनीचं स्वतःचं हॉटेल आहे आणि त्याचं नाव माही रेजीडेंसी असं आहे.
हॉका संघ - हॉकी इंडिया लीगमध्ये रांची रेंजर्स संघाचे मालकी हक्क धोनीकडे आहेत. 2014मध्ये या संघानं रांची रहिंहो या संघाची जागा घेतली होती.
फुटबॉल क्लब - इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयन एफसी संघातही गुंतवणूक केली आहे. तो या संघाचा सहमालक आहे.
एंटरटेनमेंट - धोनीनं गतवर्षी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी त्यानं उघडली असून नुकतंच त्यानं मुंबईत ऑफिस सुरु केलं आहे. त्याच्या या कंपनीचा पहिला प्रोजेक्ट हा 'द रोर ऑफ द लायन' हा होता.
फॅशन - फॅशनच्या दुनियेतही धोनीनं त्याचा स्वतःचा ब्रँड आणला आहे. सेव्हन या लाईफ स्टाईल ब्रँडमध्ये त्यानं गुंतवणुक केली आहे आणि 2016मध्ये त्याचं लाँचिंग झालं. या ब्रँडच्या फुटवेअरचा धोनी मालक आहे. 
रेसिंग टीम - धोनीला बाईक्सची किती क्रेझ आहे ते सांगयला नको. त्यानं साऊतचा सुपरस्टार नागार्जुन याच्यासह सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये माही रेसिंग टीम इंडियाचे मालकी हक्क खरेदी केले आहेत.
फिटनेस - जगभरात त्याच्या स्पोर्ट्स फिट नावाच्या 200 जीम आहेत.  

Web Title: Watch: MS Dhoni's daughter Ziva gets first brand endorsement at age of 5, features alongside daddy MSD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.