न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सनं फोर्ड चषक स्पर्धेत सर्वांना चक्रावून टाकणारा शॉट मारला. ऑकलंड संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्लेनच्या या फटक्यानं ओटॅगो संघाच्या गोलंदाजांना धक्काच दिला. ग्लेननं या सामन्यात 135 चेंडूंत 16 चौकार व 3 षटकार खेचून 156 धावांची तुफानी खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनंही ( आयसीसी) ग्लेनच्या या फटक्याचे कौतुक केलं आणि त्याचं बारसं करण्यास सांगितलं. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) राजस्थान रॉयल्सनं त्याचं बारसं केलं. ग्लेनच्या साथीनं मार्टिन गुप्तीलनंही शतकी खेळी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑकलंड संघानं 5 बाद 310 धावा केल्या. गुप्तीलनं 130 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 117 धावा केल्या. पण, या सामन्यात ग्लेनच्या त्या फटक्यानं सर्वांच लक्ष वेधलं.
पाहा व्हिडीओ...
ऑकलंडनं हा सामना 97 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना कॉलीन मुन्रो अवघ्या 10 धावांत माघारी परतला. त्यानंतर ग्लेन आणि गुप्तीलनं 235 धावांची भागीदारी करताना संघाला 50 षटकांत 5 बाद 310 धावा केल्या. त्याच्या उत्तरात ओटॅगो संघ 213 धावाच करू शकला. त्यांच्याकडून नेल ब्रूमनं 66 धावा केल्या. नॅथन स्मिथनं 43 धावा केल्या
अरे देवा... गोलंदाजानं केली LBW अपील अन् पंचांनी दिला धक्कादायक निर्णय, Videoपंचांकडून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) त्यांच्या मदतीला अनेक तंत्रज्ञान आणले. पण, त्यातूनही अनेक त्रुटी असल्याचे अनेकदा जाणवले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 21 नो बॉल टाकले. पण, मैदानावरील पंचाला त्यापैकी एकही नो बॉल दिसला नाही. त्यामुळे आता आगामी स्पर्धांमध्ये नो बॉल पाहण्याची जबाबदारी ही तिसऱ्या पंचाकडे सोपवण्याचा विचार सुरू आहे.
6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत तिसऱ्या पंचाकडे नो बॉल पाहण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. शिवाय इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) पुढील मोसमात नो बॉल पाहण्यासाठी एक अतिरिक्त पंच असणार आहे. त्यामुळे योग्य निर्णयांची अपेक्षा आहे. पण, आज आपण असा एक व्हिडीओ पाहणार आहोत. ज्यात पंचांकडून झालेल्या चुकीबद्दल काय बोलावं हेच समजणार नाही. इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात घडलेली ही घटना आहे. त्यात फलंदाजाचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला आणि गोलंदाजासह अन्य फलंदाजांनी LBW ची अपील केलं. त्यानंतर पंचांनी जो निर्णय दिला, तो पाहून तुम्हालाच धक्का बसेल..