Join us

१५ चेंडूंत ८० धावा! काव्या मारनच्या संघातील माजी खेळाडूची शाहरुख खानच्या संघासाठी आतषबाजी 

Caribbean Premier League 2023: कॅरेबियन प्रीमियर लीगच्या २०व्या सामन्यात शाहरुख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्सने बार्बाडोस रॉयल्सचा ४२ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 16:47 IST

Open in App

Caribbean Premier League 2023: कॅरेबियन प्रीमियर लीगच्या २०व्या सामन्यात शाहरुख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्सने बार्बाडोस रॉयल्सचा ४२ धावांनी पराभव केला. नाइट रायडर्सच्या या विजयात त्यांचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने ( Nicholas Pooran) महत्त्वाची भूमिका बजावली. निकोलसने ५ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावांची खेळी केली. निकोलस हा काव्या मारनच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबाद या फ्रेंचायझीचा भाग होती. सध्या लखनौ सुपर जायंट्सचा एक भाग आहे. 

निकोलस पूरनच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने ६ बाद २०८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बार्बाडोस रॉयल्सला २० षटकांत ७ बाद १६६ धावा करता आल्या. त्रिनबागो नाईट रायडर्सच्या अक्कील हुसैन आणि वकार सलामखिल यांनी अनुक्रमे २१ आणि १८ धावांत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अली खान, आंद्रे रसेल आणि सुनील यांनाही १-१ विकेट घेण्यात यश आले.बार्बाडोस रॉयल्सकडून सलामीवीर कायल मेयर्सने ४५ चेंडूत ७० धावा केल्या, त्यात ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. मात्र त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले.

बार्बाडोस रॉयल्सचे ५ फलंदाज एकेरी धावसंख्येत माघारी परतले. अष्टपैलू जेसन होल्डरने १९ आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वेने २० धावा  केल्या. तत्पूर्वी, त्रिनबागो नाइट रायडर्सकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने ३० चेंडूत ३८ धावा केल्या, तर अष्टपैलू आंद्रे रसेलने २२ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी केली. कॅरिबियन प्रीमियर लीग 2023 मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सचा 7 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे. त्याला ९ गुण आहेत. तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगवेस्ट इंडिज
Open in App