पाकिस्तान क्रिकेट संघाला वन डे मालिकेतील कामगिरीतील सातत्य ट्वेंटी-20 राखण्यात अपयश आले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानला 64 धावांनी पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेच्या 5 बाद 165 धावांचा पाठलाग करताना पाकचा संपूर्ण संघ 101 धावांत माघारी परतला. लंकेच्या दनुष्का गुणथीलकाने 38 चेडूंत 57 धावांची दमदार खेळी केली. लंकेने या मालिकेत 1-0 अशी आघाडी केली.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना गुणथीलका आणि अविष्का फर्नांडो यांनी जोरदार फटकेबाजी करताना 84 धावांची सलामी दिली. फर्नांडोने 33 धावांची खेळी केली. भानुका राजपक्षे ( 32) यानेही चांगली खेळी करताना संघाला 165 धावांपर्यंत मजल मारून दिली. घरच्या मैदानावर पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते, परंतु लंकेच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. नुवान प्रदीप ( 3/21), इसुरू उदाना ( 3/11) आणि वनींदू हसरंगा ( 2/20) यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 17.4 षटकांत 101 धावांत माघारी परतला.
या सामन्यात कर्णधार सर्फराज अहमद ( 24) आणि इफ्तीकार अहमद (25) यांनी संघर्ष केला. पण, त्यांच्या संघर्षाचा शेवट हास्यास्पद झाला. सर्फराज आणि इफ्तीकार यांच्यात ताळमेळ चुकला आणि दोघंही एकाच एंडला धावले. हा प्रसंग 12 व्या षटकात घडला. जेव्हा इफ्तीकारनं शनाकाच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेनं फटका मारला आणि दुसऱ्या बाजूनं सर्फराज एक धाव घेण्यासाठी धावत सुटला. पण, इफ्तीकार मधूनच पुन्हा माघारी फिरला आणि दोन्ही खेळाडू एकाच दिशेला धावताना दिसले.
पाहा व्हिडीओ..
Video : अशी फिल्डिंग पाकिस्तानचे खेळाडूच करू शकतात, पाहाल तर लोटपोट व्हालपाकिस्तानने वन डे क्रिकेट मालिकेत श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवला. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलेल्या या मालिकेत पाकिस्तानी खेळाडूंने वर्चस्व गाजवले. पण, क्षेत्ररक्षणात पाकिस्तानी खेळाडूंचा ढिसाळपणा पुन्हा एकदा दिसला आणि कॅमेरात कैद झालेला हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट व्हाल हे नक्की.. पाकिस्तानच्या खेळाडूंनं क्षेत्ररक्षण करताना चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकण्याएवजी भलतीकडेच टाकला आणि त्यानंतर तो अडवण्यासाठी दोन खेळाडूंना मैदानावर लोटांगण घालावे लागले. बर इतकं करूनही चेंडू सीमापार जायचा तो गेलाच.