लाहोर : जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र दर्ज काढून घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी, सर्फराज खान, जावेद मियाँदाद आदींनी भारताच्या या पावलावर टीका केली. त्यात शोएब अख्तरचाही समावेश होता, परंतु त्याला आता उपरती सुचली आहे. दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढू नये अशी विधानं कुणीही करू नका, असे आवाहन अख्तरने केले आहे.
शोएब अख्तरने यू ट्युबवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्याच्यासह पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद वसीमही आहे. त्यांच्या या संपूर्ण चर्चेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावासह, दोन्ही देशांतील क्रिकेटपटूंमधील काही मजेशीर किस्सेही सांगितले. तो म्हणाला,''आमची परिस्थिती सध्या खराब आहे, हे मी मान्य करतो. तुम्ही तुमच्या देशावर प्रेम करता आणि आम्ही आमच्या, परंतु दोन देशांतील तणाव आणखी वाढण्याचे निमित्त आम्हाला बनायचे नाही. काश्मीर मुद्यावर सध्या परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळी त्यात आणखी भर पडेल, अशी विधानं करणे टाळायला हवे.''
पाहा व्हिडीओ..
मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारेपाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने वादग्रस्त विधान केले आहे. त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करताना पाकिस्तानकडे असलेले अणुबॉम्ब हे केवळ दाखवण्यासाठी नाहीत, असा इशारा दिला. पाकिस्तानमधील खेलशेल.कॉम या वेबसाईटनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मियाँदादचा व्हिडीओ शेअर केला. त्यात त्याला काश्मीर मुद्यावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मियाँदाद म्हणाला,''तुमच्याकडे घातकी हत्यारं आहेत, तर जीव वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करायला हवा. मोदी डरपोक आहे. आमच्याकडे असलेला अणुबॉम्ब हा फक्त दाखवण्यासाठी नाही, त्याचा उपयोग करून भारताला साफ करून टाकू.''
पाहा व्हिडीओ..