Join us  

६,६,६,१,६,NB१,६! अश्विनच्या संघावर २१ वर्षीय फलंदाज भारी पडला, ६ चेंडूंत सामना खिशात टाकला 

TNPL 2023 Qualifier 2 : तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ मध्ये नेल्लई रॉयल किंग्स अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:31 AM

Open in App

TNPL 2023 Qualifier 2 : तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ मध्ये नेल्लई रॉयल किंग्स अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्यांनी डिंडीगुल ड्रॅगन्सचा ७ विकेट्स राखून पराभव केला. विजयासाठी १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुरुस्वामी अजितेशचे नाबाद ७३ आणि यष्टिरक्षक-फलंदाज हृतिक ईश्वरनने ११ चेंडूंत नाबाद ३९ धावा चोपल्या. ईश्वरनने आपल्या डावात ६ षटकार ठोकले. अजितेशने ४४ चेंडूंत ५ षटकार आणि तितकेच चौकार मारले. प्रथम फलंदाजी करताना दिंडीगुलने शिवम सिंग ( ७६) आणि भूपती कुमार (४१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद १८५ धावा केल्या होत्या.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात असल्यामुळे आर अश्विन या लढतीत खेळला नाही आणि त्यामुळे डिंडीगुलला गोलंदाजीत अश्विनची कमतरता जाणवली. त्याच्या अनुपस्थितीत बाबा इंद्रजीतने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. वरुण चक्रवर्तीही संघात होता पण किंग्जच्या फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध कोणताही धोका पत्करला नाही. शेवटच्या दोन षटकांत किंग्ज संघाला विजयासाठी ३७ धावांची गरज होती. अजितेश आणि ईश्वरन यांनी मिळून १९ व्या षटकात ३३ धावा केल्या ज्यात ५ षटकारांचा समावेश होता. त्यापैकी ६ षटकार ईश्वरनने लगावले. शेवटच्या षटकातही विजयासाठी ६ धावांची गरज असताना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. ईश्वरनने षटकार खेचून विजय पक्का केला. 

 

प्रथम फलंदाजी करताना दिंडीगुलच्या शिवमने ४६ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ७६ धावा केल्या. त्याने आणि भूपती कुमार ( ४१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तुटल्यानंतर दिंडीगुलचा डाव गडगडल्याने संघ १८५ धावांवर अडकला. किंग्जसाठी सोनू यादवने ३१ धावांत दोन बळी घेतले.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटतामिळनाडू
Open in App