Join us  

Video : शाकिब अल हसन पुन्हा वादात; पारा चढला अन् चाहत्यावर केला हल्ला

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan) स्वतःला वादापासून दूर ठेऊच शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 12:16 PM

Open in App

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan) स्वतःला वादापासून दूर ठेऊच शकत नाही. शाकिबला फार लवकर राग येतो आणि त्यामुळे तो अनेकदा वादात अडकला आहे. ट्वेंटी-२० व वन डे क्रमवारीत नंबर १ व कसोटीत तिसऱ्या क्रमांकाचा ऑल राऊंडर असलेल्या शाकिबने एका चाहत्यावर रागात हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चत्तोग्राम येथे एका कार्यक्रमाला गेला असताना त्याने चाहत्यावर हल्ला केला.

शाकिबला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती आणि त्यातून त्याला बॉडिगार्ड वाट काढून कार्यक्रमाच्या ठिकाणी नेत होते. तेव्हा अचानक शाकिबने चाहत्याची टोपी घेतली अन् त्यानेच त्याच्यावर हल्ला करण्यास सुरूवात केले.   यापूर्वी मैदानावरही शाकिबचा पारा चढलेला पाहायला मिळाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कारवाईही केली आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात शाकिबच्या कामगिरीमुळे बांगलादेशने विजय मिळवला.

काल झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यात शाकिबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने ६ विकेट्सने इंग्लंडवर विजय मिळवला. नजमुल होसैनने ३० चेंडूंत ५१ धावांची खेळी करताना संघाला १५७ धावांचे लक्ष्य पार करून दिले. शाकिबने नाबाद ३४ धावा केल्या. तत्पूर्वी, जोस बटलरच्या ६७ धावांच्या जोरावर इंग्लंडने ६ बाद १५६ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बांगलादेश
Open in App