Join us  

Video : नाचली, हसली अन् अखेर रडली! SRHने हरल्याने काव्या मारनची अशी अवस्था झाली 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर  लीग २०२३ मधील मागील काही सामने कमालीचे चुरशीचे झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 12:17 AM

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमिअर  लीग २०२३ मधील मागील काही सामने कमालीचे चुरशीचे झाले. त्यात आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( SRH vs KKR) यांची भर पडली. विजयासाठी १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला अखेरच्या ३० चेंडूंत ३८ धावा करायच्या होत्या आणि तरीही ते हरले. हा सामना हातात आहे असे वाटत असताना SRHची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) सुरूवातीला फार आनंदात होती. हैदराबादच्या गोलंदाजांनीही आधी सुरेख कामगिरी केल्याने ती खूश होती, पण KKR चा फिरकीपटू वरुणने 'चक्र' फिरवले अन् हसरी काव्या रडताना दिसली. मार्को यान्सेन व कार्तिक त्यागी यांनी KKRला सुरूवातीला धक्के दिले होते. पण, कर्णधार नितीश राणा ( ४२) , रिंकू सिंग ( ४६) व आंद्रे रसेल ( २४) यांनी संघाला ९ बाद १७१ धावांपर्यंत पोहोचवले. हैदराबादची सुरुवातही काही खास झाली नाही. मात्र, कर्णधार एडन मार्कराम व हेनरिच क्लासेन यांनी ७० धावांची भागीदारी करताना संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले.  

ही जोडी तोडण्यासाठी शार्दूल ठाकूरला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्याने १५व्या षटकात क्लासेनला ३६ धावांवर बाद केले. हैदराबादने मॅच ३० चेंडू ३८ धावा अशी जवळ आणली. वैभव अरोराने टाकलेल्या १७व्या षटकात  मार्कराम ४१ धावांवर झेलबाद झाला. अखेरच्या षटकात ९ धावांची गरज असताना वरूण चक्रवर्थीने ३ धावा दिल्या अन् अब्दुल समदची ( २१) विकेट घेऊ मॅच फिरवली. हैदराबादला ८ बाद १६६ धावाच करता आल्या आणि कोलाकाताने ५ धावांनी सामना जिंकला. 

संपूर्ण सामन्यात आनंदात असलेली काव्या मारन मात्र सामन्यानंतर चेहरा लपवून गप्प बसलेली पाहयला मिळाली.

 

टॅग्स :आयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स
Open in App