IPL 2021, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Update : कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( DC) संघाविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना दिल्लीच्या धावसंख्येवर अंकूश मिळवले. दिल्लीला ९ बाद १२७ धावाच करता आल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांदा दिल्लीला डावात एकही षटकार खेचता आला नाही. पण, या सामन्यात मोठा अपघात होता होता वाचला. फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) यष्टिरक्षक दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) याला जवळपास जखमी केलंच होतं. दिल्लीच्या कर्णधाराच्या कृतीनंतर मैदानावर काही काळ हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता.
कोलकातानं नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीला बोलावलं. पृथ्वी शॉ जखमी झाल्यामुळे आजच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ सलामीला आला. त्यानं आणि शिखर धवन यांना दिल्लीसाठी आश्वासक सुरूवात करता आली नाही.
आयपीएल २०२१मधील ऑरेंज कॅपधारक धवन २४ धावांवर ल्युकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस अय्यर ( १), शिमरोन हेटमायर ( ४), ललित यादव ( ०), अक्षर पटेल ( ०) व आर अश्विन ( ९) यांना झटपट माघारी पाठवून कोलकातानं सामन्यावर मजबूत पकड घेतली. स्टीव्ह स्मिथ ( ३९) व
रिषभ पंत ( ३९) यांनी किंचितसा संघर्ष केला, परंतु मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले. फर्ग्युसन, सुनील नरीन व वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
डावाच्या १७व्या षटकात वरूण चक्रवर्थीच्या पहिल्याच चेंडूवर रिषभ पंतचा फटका चूकला. चेंडू स्टम्प्सच्या दिशेनं जाताना पाहून रिषभनं तो रोखण्यासाठी बॅट भिरकावली अन् ती जवळपास यष्टिरक्षक दिनेश कार्तिक याला लागलीच होती. पण, दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. त्यानंतर रिषभनं त्याची माफी मागितली.
पाहा नेमकं काय घडलं..
Web Title: Watch Video : Dinesh Karthik had a close shave as Rishabh Pant tried to stop the ball from falling back on the stumps
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.