Video: ग्लेन मॅक्सवेलचा धमाका! गुडघ्यावर बसून स्पिनरला मारला १०३ मीटर उत्तुंग षटकार

Glenn Maxwell Six Video, MLC 2024: मॅक्सवेलने २३ चेंडूत ५ षटकारांसह ठोकल्या ५४ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 02:39 PM2024-07-26T14:39:33+5:302024-07-26T14:41:38+5:30

whatsapp join usJoin us
Watch Video Glenn Maxwell smashes 103M maximum off in form Hassan Khan during SFU-WAF 2024 MLC Qualifier | Video: ग्लेन मॅक्सवेलचा धमाका! गुडघ्यावर बसून स्पिनरला मारला १०३ मीटर उत्तुंग षटकार

Video: ग्लेन मॅक्सवेलचा धमाका! गुडघ्यावर बसून स्पिनरला मारला १०३ मीटर उत्तुंग षटकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Glenn Maxwell Six Video, MLC 2024: मेजर लीग क्रिकेट टूर्नामेंट अमेरिकेत खेळली जात आहे. त्यात सध्या क्वालिफायर सामने सुरु आहेत. यातील एका सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने दमदार खेळी केली. या सामन्यात मॅक्सवेलने २३५च्या स्ट्राईक रेटने धमाकेदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत तब्बल ५ षटकार होते. या दरम्यान, मॅक्सवेलच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार उपस्थित चाहत्यांना पाहायला मिळाला.

मॅक्सवेलचा हा षटकार वॉशिंग्टन फ्रीडम संघाच्या डावाच्या १५व्या षटकात दिसला. हसन खान सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससाठी गोलंदाजी करत होता. त्याने मॅक्सवेलच्या फटक्यापासून वाचण्यासाठी षटकातील पहिला चेंडू ऑफ साइडला टाकला. पण मॅक्सवेलने मात्र मनात ठरवले होते की हवाई फटका खेळायचा. मॅक्सवेलने गुडघ्यावर बसून ऑफ साइडला पडलेला चेंडू लाँग ऑनच्या दिशेने खेळला आणि एक हवाई शॉट मारला. हा षटकार १०३ मीटर उंच गेला आणि ग्लेन मॅक्सवेलचा हा शॉट पाहून साऱ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, मॅक्सवेलने क्वालिफायर सामन्यात २३ चेंडू खेळले आणि ४ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावा केल्या. दुसरीकडे ट्रेव्हिस हेडने देखील ४४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळींच्या जोरावर वॉशिंग्टन फ्रीडम संघाने अवघ्या १५.३ षटकांत १४६ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

Web Title: Watch Video Glenn Maxwell smashes 103M maximum off in form Hassan Khan during SFU-WAF 2024 MLC Qualifier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.