Join us  

Mumbai Indians new anthem : मुंबई इंडियन्सच्या नव्या गाण्यातून 'मराठी' एकदमच गायब, गुजरात टायटन्सने अस्मिता जपली; Video

Mumbai Indians releases its new anthem - इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने बुधवारी IPL 2022साठी नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 3:28 PM

Open in App

Mumbai Indians releases its new anthem - इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने बुधवारी IPL 2022साठी नव्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित केला. 'आला रे आला...' या गाण्यानं इतकी वर्ष मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला भुरळ घातली होती आणि आता मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना ''MI MI बोल के, खेलेंगे दिल खोलेंगे'' ( “MI MI BOL KE, KHELENGE DIL KHOLKE”) असे गायला लागणार आहेत. आयपीएल २०२२ मध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) ने त्यांची अस्मिता जपून anthem गाणं गुजराती भाषेतच काढलं आहे.मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यांना दोन्ही लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. आज ते कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहेत. त्याआधी MI Fans चा  उत्साह वाढवण्यासाठी मुंबई इंडियन्सनं नवं गाणं रिलिज केलं आहे. या गाण्यात इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्युकमार यादव, किरॉन पोलार्ड, रोहित शर्मा यांच्यासह अर्जुन तेंडुलकरही ( Ajrun Tendulkar ) झळकला आहे. 

फॅन्स मुंबईच्या रस्त्यांवर, जुन्या चाळींमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहेत. आला रे आला.. . ची जागा घेतली खेलेंगे दिल खोल के! असे म्हणावे लागणार आहे.  RCB vs RR या लढतीतील निकालानंतर राजस्थान रॉयल्स ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात २, तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांना खाते उघडताच आलेले नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सरोहित शर्माअर्जुन तेंडुलकरजसप्रित बुमराह
Open in App