पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) सोमवारी एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. येथील नॅशनल स्टेडियमबाहेर लहान मुलांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाविरोधात ( PCB) धरणे आंदोलन केलं आणि घोषणाबाजीही केल्या. या लहान मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी पाकिस्तान सुपर लीगचा सामना पाहण्यासाठी मॅच तिकीट खरेदी केले होते, तरीही त्यांना स्टेडियमवर प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे नाराज लहान मुलांनी घोषणाबाजी केली.
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेत पाकिस्तानात PSL7 खेळवली जात आहे. या लीगचे सर्व सामने नॅशनल स्टेडियमवर खेळवले जात आहेत. त्यामुळे सामना पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सामना पाहण्यासाठी काही कुटुंबीय त्यांच्या मुलांना सोबत घेऊन आली. पण, सुरक्षारक्षकांनी १२ वर्षांखालील मुलांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नाही. त्यानंतर फॅन्स, सुरक्षारक्षक आणि आयोजक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर लहान मुलांनी धरणे आंदोलन केलं.
पाहा व्हिडीओ...