Join us  

IPL 2022 : Umran Malik नं 153 km/hr च्या वेगानं टाकला जबरदस्त यॉर्कर; डेल स्टेनही अवाक्

IPL 2022 : गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यात उम्रान मलिक (Umran Malik) यानं वेगवान गोलंदाजी करत गुजरातच्या खेळाडूंच्या नाकी नऊ आणले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:29 AM

Open in App

IPL 2022 : गुजरातविरुद्धच्या सामन्यात उम्रान मलिकने (Umran Malik) आपल्या वेगवान गोलंदाजीच्या मदतीनं गुजरातच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. T20 मध्ये पहिल्यांदाच उमरानने ५ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. इतकंच नाही तर या आयपीएलमध्ये त्यानं आपली सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचंही यश मिळवलं. या सामन्यात उम्राननं ४ ओव्हर्समध्ये २५ धावा देत ५ गडी बाद केले. 

आपल्या गोलंदाजीदरम्यान उमराननं गुजरातचा ओपनर रिद्धीमान साहाला ताशी १५३ किमीच्या वेगानं टाकलेल्या यॉर्करवर बाद करत पॅव्हिलिअनमध्ये धाडलं. हा चेंडू पाहून डग आऊटमध्ये बसलेला बॉलिंग कोच डेल स्टेननंही आश्चर्य व्यक्त केलं. उमरानच्या गोलंदाजीचा सामना करताना गुजरातच्या फलंदाजांना कठिण जात असल्याचं दिसत होतं. शुभमन गिल असेल किंवा कर्णधार हार्दिक पांड्या या सर्वांना उम्राननं माघारी धाडलं. आपल्या या वेगवान चेंडूसह त्यानं या सीजनमध्ये आठव्यांदा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या आयपीएलच्या सीझनमध्ये उमराननं जबरदस्त गोलंदाजी करत ८ सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले. जम्मू काश्मीरचा हा गोलंदाज सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात टी नटराजनचा रिप्लेसमेंट म्हणून दाखल झाला होता आणि आज तो संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. त्याच्या वेगासमोर गुजरातच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पाच विकेट्स घेत त्याने SRHला विजयी मार्गावर आणले. 

टॅग्स :आयपीएल २०२२गुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App