गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. इतर पर्वाप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स ( MI) जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma)ची सरावातील फटकेबाजी पाहून MI जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, यावर तुमचाही विश्वास बसेल. रोहितनं टोलावलेला उत्तुंग षटकार चक्क मैदानाबाहेरून जाणाऱ्या बसच्या छतावर पडला.
युवराज सिंग निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या कोणत्या संघाकडून ट्वेंटी-20 खेळणार
दुबईत दाखल झाल्यानंतर 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) सरावाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या ( Hardik Pandya), कृणाल पांड्या यांनी सरावात दमदार खेळ दाखवला. हिटमॅन रोहितनंही चौकार-षटकाराची आतषबाजी केली. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या खेळाडूंच्या सराव सत्राचे अऩेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात बुधवारी त्यांनी पोस्ट केलेला रोहितचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला.
IPL 2020त कोण दाखवणार दम?; 8 संघांच्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर!
RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार!
सुरेश रैनाचे दोन मोठे विक्रम IPL 2020मध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली मोडणार!
पाहा व्हिडीओ...
मुंबई इंडियन्स Mumbai Indians Players List (MI) - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
बुमराहने सहा वेगवेगळ्या स्टाईलने टाकले चेंडूमुंबई इंडियन्सचा सराव सुरू असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चक्क सहा चेंडू वेगवेगळ्या गोलंदाजांच्या स्टाईलमध्ये टाकले. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या टिष्ट्वटरवर पोस्ट केला . मुंबई इंडियन्स संघ सरावात मग्न आहे. सराव सुरू असताना बुमराने एक भन्नाट षटक टाकले. या षटकामधील सहाच्या सहा चेंडू वेगवेगळ्या स्टाईलमध्ये टाकले आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या टिष्ट्वटर हँडलवर बुमराहचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधील सहा गोलंदाजांना तुम्ही ओळखता का, असा सवालही मुंबई इंडियन्सने चाहत्यांना केला आहे.