Join us  

Video : ७ वर्षांनंतर मैदानावर उतरून पहिली विकेट घेताच भावूक झाला श्रीसंत!

३७ वर्षीय श्रीसंतनं मैदानावर येताच क्रीजला नमस्कार केला. तो पूर्वीच्याच आक्रमक पवित्र्यात दिसला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 12, 2021 12:41 PM

Open in App

भारताचा गोलंदाज एस श्रीसंत ( S Sreesanth) यानं सात वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत श्रीसंतकेरळ संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहे. त्यानं पहिल्याच सामन्यात चार षटकांत २९ धावा देताना एक विकेट घेतली. त्यानं पुद्दुचेरी संघाचा फलंदाज फाबिद अहमद याचा त्रिफळा उडवला. इतक्या वर्षानंतर मैदानावर उतरून पहिली विकेट घेतल्यानंतर श्रीसंत भावूक झाला. आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याच्यावर ७ वर्षांची बंदी घातली गेली होती. BCCIनं त्याच्यावर ही बंदी घातली होती. (  Sreesanth takes his first wicket in 7 years for Kerala) 

३७ वर्षीय श्रीसंतनं मैदानावर येताच क्रीजला नमस्कार केला. तो पूर्वीच्याच आक्रमक पवित्र्यात दिसला. त्यानं दुसऱ्या षटकात विकेट घेतली. त्यानं हा भावनिक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले. २००७ व २०११च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्यानं २७ कसोटीत ८७ विकेट्स घेतल्या, तर ५३ वन डे सामन्यांत ७५ विकेट्स घेतल्या.  (  Sreesanth takes his first wicket in 7 years for Kerala) 

केरळ संघानं पुद्दुचेरीवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पुद्दुचेरीनं २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. जलज सक्सेनानं १३ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. केरळकडून रॉबिन उथप्पानं २१ आणि कर्णधार संजू सॅमसननं ३२ धावा केल्या. केरळनं १८.२ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात विजय मिळवला.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :श्रीसंतकेरळ