IND vs AUS T20I Series : भारतीय संघाने शेवटच्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमहर्षक विजयाची नोंद केली आणि पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावा करायच्या होत्या, परंतु अर्शदीप सिंगने तिखट मारा करताना ३ धावा दिल्या आणि १ विकेट घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची हार झाली. विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने महेंद्रसिंग धोनीने सुरू केलेली परंपरा कायम राखली. त्याने विजेतेपदाची ट्रॉफी रिंकू सिंग व जितेश शर्मा यांच्या हाती सूपूर्द केली.
बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६० धावा केल्या. केवळ श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले. दडपण असतानाही भारतीय गोलंदाजांनी हार मानली नाही आणि मुकेश कुमारच्या ३ आणि रवी बिश्नोईच्या २ बळींच्या बळावर संघाने अखेर ६ धावांनी विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने शेवटचे षटक फेकले आणि त्याने अवघ्या ३ धावा देत संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड आणि जोश फिलिप यांनी भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. मात्र मुकेश कुमार, अर्शदीप आणि रवी यांनी हार न मानता सातत्याने विकेट घेतल्या. २००७ साली धोनीने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून युवा खेळाडूंच्या हाती सोपवली. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने ही परंपरा चालू ठेवली. सूर्याने विजेतेपदाची ट्रॉ़फी जितेश आणि रिंकूला दिली.