T20 World Cup : बेगानी शादी मे...! नेदरलँड्सच्या विजयानंतर अक्रम, वकार, मलिक यांचा Live कार्यक्रमात डान्स, Video 

Pakistan qualifies for T20 World Cup semi-final - ६ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, अशी पुसटची आशाही कुणाला नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 03:28 PM2022-11-07T15:28:23+5:302022-11-07T15:28:48+5:30

whatsapp join usJoin us
Watch Video : Wasim Akram, Waqar Younis dance as Pakistan qualifies for T20 World Cup semi-final | T20 World Cup : बेगानी शादी मे...! नेदरलँड्सच्या विजयानंतर अक्रम, वकार, मलिक यांचा Live कार्यक्रमात डान्स, Video 

T20 World Cup : बेगानी शादी मे...! नेदरलँड्सच्या विजयानंतर अक्रम, वकार, मलिक यांचा Live कार्यक्रमात डान्स, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan qualifies for T20 World Cup semi-final - ६ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, अशी पुसटची आशाही कुणाला नव्हती. पण, चमत्कार घडला अन् नेदरलँड्सने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायक पराभव केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सर्वात धक्कादायक निकाल म्हणावं लागेल. आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाल्यानंतर पाकिस्तानला लॉटरी लागली. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या लढतीला अचानक महत्त्व प्राप्त झाले आणि बाबर आजम अँड कंपनीने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या या अशक्यप्राय यशानंतर माजी खेळाडू वासीम अक्रम, वकार युनूस, मिसबाह उल हक व शोएब मलिक यांनी लाईव्ह कार्यक्रमात डान्स केला.

इंग्लंडविरुद्धच्या IMP लढतीत भारत Playing XI मध्ये दोन बदल करणार; राहुल द्रविडचे संकेत

 

पाकिस्तानने ग्रुप २ मध्ये अखेरच्या सामन्यात बांगलादेशवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी फारकाही चांगली झालेली नाही. नेदरलँड्सने अनपेक्षित निकाल नोंदवला म्हणून त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी मौके पे चौका मारला. पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर वासीम अक्रम, वकार युनूस, मिसबाह उल हक व शोएब मलिक या माजी कर्णधारांनी लाईव्ह कार्यक्रमात डान्स करण्यास सुरुवात केली.  

पाकिस्तानची कामगिरी 

  • ४ विकेट्सने पराभूत विरुद्ध भारत
  • १ धावेने पराभूत विरुद्ध झिम्बाब्वे
  • ६ विकेट्स राखून वि. विरुद्ध नेदरलँड्स
  • ३३ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • ५ विकेट्स राखून वि. विरुद्ध बांगलादेश 

 

सेमी फायनलचे वेळापत्रक

  • न्यूझीलंड- पाकिस्तान, ९ नोव्हेंबर, सिडनीवर दुपारी १.३० वाजल्यापासून 
  • भारत-इंग्लंड, १० नोव्हेंबर, एडिलेडवर दुपारी १.३० वाजल्यापासून 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: Watch Video : Wasim Akram, Waqar Younis dance as Pakistan qualifies for T20 World Cup semi-final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.