६,६,६,६,६,६,६,६,६! युसूफ पठाणच्या २६ चेंडूंत नाबाद ८२ धावा; पाकिस्तानी गोलंदाजाला बेक्कार चोपले, Video

Zimbabwe Afro T10 - जोहान्सबर्ग बफेलोस ( Johannesburg Buffaloes) संघाकडून खेळणाऱ्या युसूफ पठाणने ( Yusuf pathan) शुक्रवारी झिम्बाब्वे आफ्रो टी१० लीगमध्ये वादळी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:51 PM2023-07-28T20:51:42+5:302023-07-28T20:52:18+5:30

whatsapp join usJoin us
Watch Video : YUSUF PATHAN scored 82* runs from just 26 balls including 4 fours & 9 sixes when Joburg needed 126 from 46 balls. | ६,६,६,६,६,६,६,६,६! युसूफ पठाणच्या २६ चेंडूंत नाबाद ८२ धावा; पाकिस्तानी गोलंदाजाला बेक्कार चोपले, Video

६,६,६,६,६,६,६,६,६! युसूफ पठाणच्या २६ चेंडूंत नाबाद ८२ धावा; पाकिस्तानी गोलंदाजाला बेक्कार चोपले, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Zimbabwe Afro T10 - जोहान्सबर्ग बफेलोस ( Johannesburg Buffaloes) संघाकडून खेळणाऱ्या युसूफ पठाणने ( Yusuf pathan) शुक्रवारी झिम्बाब्वे आफ्रो टी१० लीगमध्ये वादळी खेळी केली. संघाला विजयासाठी ४६ चेंडूंत १२६ धावांची आवश्यकता असताना युसूफने डर्बन कलंदर्स ( Durban Qalandars) संघाच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. त्यात युसूफच्या तावडीत पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीर सापडला अन् त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. युसूफने २६ चेंडूंत ४ चौकार व ९ षटकार ठोकताना नाबाद ८२ धावा करून संघाला १ चेंडू व ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.


प्रथम फलंदाजी करताना कलंदर्स संघाकडून आंद्रे फ्लेचरने १४ चेंडूंत ३९ धावा आणि आसीफ अलीने १२ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. निक वेल्चनेही ९ चेंडूंत नाबाद २४ धावा चोपताना संघाला ४ बाद १४० धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात बफेलोस संघाचे आघाडीचे तीन फलंदाज, मोहम्मद हाफिज ( १७), टॉम बँटन ( ४) आणि विल स्मीद ( १६) हे झटपट माघारी परतले. रवी बोपाराही १ धाव करून बाद झाला. बफलोस संघाला ४६ चेंडूंत १२६ धावांची गरज असताना युसूफने चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि ९.५ षटकांत ४ बाद १४२ धावा करून संघाचा विजय निश्चित केला. 


Web Title: Watch Video : YUSUF PATHAN scored 82* runs from just 26 balls including 4 fours & 9 sixes when Joburg needed 126 from 46 balls.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.