पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली हा त्याच्या सेलिब्रेशनमुळे क्रिकेट विश्वात ओळखला जातो. पण त्यामध्ये एक चांगला डान्सर दडलेला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हसन अली रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. आसिफ अलीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ कुठला आहे हे त्याने सांगितलेले नाही. हसन अली सध्या पाठिच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. त्यासाठी तो ऑस्ट्रेलियात जाणे अपेक्षित होते, परंतु तो अजूनही पाकिस्तानमध्ये आहे.
कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!
२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हसन अलीने ५ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या होत्या. पण २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला चार सामन्यांत केवळ २ विकेट्स घेता आल्या. त्यानंतर त्याला अंतिम ११ मधून वगळण्यात आले. जानेवारी २०१९ नंतर हसन अली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं त्याला सेंट्रल करारातूनही वगळले.
2016मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं 53वन डे सामन्यांत 82 विकेट्स घेतल्या आहेत. नऊ कसोटी सामन्यांत त्यानं 31 विकेट्स, तर 30 ट्वेंटी-20सामन्यांत 35 विकेट्स घेतल्या आहेत.
पाहा व्हिडीओ...
@sajid_rahmani_555 ##hassanali##rahmani##sajidrahmani555##sajid
♬ original sound - shadabkhanreal
निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!
शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम
कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार!