बिनधास्त, बेधडक!; यशपाल शर्मा यांची १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ती' अविस्मरणीय खेळी अन् टीम इंडिया फायनलमध्ये, Video

८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील महत्त्वाचे सदस्य यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:13 PM2021-07-13T12:13:50+5:302021-07-13T12:14:27+5:30

whatsapp join usJoin us
WATCH: Yashpal Sharma’s brilliant batting in the semi-final of 1983 World Cup against England. | बिनधास्त, बेधडक!; यशपाल शर्मा यांची १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ती' अविस्मरणीय खेळी अन् टीम इंडिया फायनलमध्ये, Video

बिनधास्त, बेधडक!; यशपाल शर्मा यांची १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ती' अविस्मरणीय खेळी अन् टीम इंडिया फायनलमध्ये, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील महत्त्वाचे सदस्य यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. भारतीय संघातील मधल्या फळीतील ते महत्त्वाचे खेळाडू होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे सदस्य असलेल्या यशपाल यांनी ३७ वन डे व ४२ कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. ८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडच्या गोलंदाजांची केलेली धुलाई आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. त्यांच्या निधनानंतर त्या अविस्मरणीय खेळीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ( India Semi final match against England in 1983 World Cup, Yashpal Sharma played a important knock) 

१९७९-८३ या कालावधीत ते भारतीय संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी काही वर्ष राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही काम केले. ६६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय त्यांनी स्थानिक क्रिकेटही गाजवले. त्यांनी १६० प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४४.८८च्या सरासरीनं ८९३३ धावा केल्या, तर ७४ लिस्ट ए क्रिकेटमध्ये १८५९ धावा केल्या.  

वर्ल्ड कपमधील वेस्ट इंडिजच्या पहिल्या पराभवात यशपाल यांचा सिंहाचा वाटा..
१९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यात यशपाल यांनी ८९ धावांची खेळी केली होती. त्यांच्या याच खेळीच्या जोरावर भारतानं ८ बाद २६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ ५४.१ षटकांत २२८ धावांत तंबूत परतला होता. रॉजर बिन्नी व रवी शास्त्री यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ६१ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या २१३ धावांचा पाठलाग करताना भारतानं सहा विकेट्स राखून विजय मिळवला. भारतानं ५४.४ षटकांत ४ बाद २१४ धावा केल्या होत्या. याच सामन्यात यशपाल यांनी इंग्लंडच्या अॅलन लॅम्ब यांना शॉर्ट फाईन लेगवरून डायरेक्ट हिट करून धावबाद केले होते.  



 

Web Title: WATCH: Yashpal Sharma’s brilliant batting in the semi-final of 1983 World Cup against England.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.