WBBL 2022 FINAL: ऐकावं ते नवलंच... ऊन जास्त असल्याने थांबला क्रिकेटचा सामना

बिग बॅश लीग फायनलच्या सामन्यात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 01:34 PM2022-11-28T13:34:03+5:302022-11-28T13:35:27+5:30

whatsapp join usJoin us
WBBL Final excessive sunlight stops play interruption Sydney sixers Adelaide strikers | WBBL 2022 FINAL: ऐकावं ते नवलंच... ऊन जास्त असल्याने थांबला क्रिकेटचा सामना

WBBL 2022 FINAL: ऐकावं ते नवलंच... ऊन जास्त असल्याने थांबला क्रिकेटचा सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WBBL 2022 FINAL: अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघाने शानदार कामगिरी करत महिला बिग बॅश लीगच्या (WBBL) आठव्या सत्राचे विजेतेपद पटकावले. नॉर्थ सिडनी ओव्हल येथे शनिवारी (२६ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सने सिडनी सिक्सर्सचा १० धावांनी पराभव केला. विशेष बाब म्हणजे अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सने पहिल्यांदाच WBBL चे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी सिक्सर्सचे तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. हा सामना सुरू असताना एका विचित्र कारणामुळे थांबवावा लागला. पावसामुळे खेळ थांबवण्याचे अनेक प्रकार घडले होते. पण या सामन्यात प्रखर सुर्यप्रकाशामुळे सामना थांबवावा लागला.

उन्हामुळे सामना थांबवावा लागला

अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सच्या विजयात अष्टपैलू डिआंड्रा डॉटिनने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने अर्धशतकी खेळीशिवाय दोन विकेट्स घेतल्या. सामन्या दरम्यान एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली, जेव्हा सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. ही संपूर्ण घटना सिडनी सिक्सर्सची इनिंग सुरू होण्यापूर्वी घडली. त्यावेळी सुझी बेट्स आणि एलिसा हिली संघाची सलामी देण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.

सुझी बेट्सला स्ट्राइक घ्यायची होती पण प्रखर सूर्यप्रकाशामुळे खेळण्यास त्रास होत होता. अशा स्थितीत पंचांनी काही काळ खेळ थांबवला. उन्हामुळे खेळ थांबवावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असे घडले आहे. विशेषत: न्यूझीलंडच्या मैदानी भागात हे अनेकदा पाहायला मिळते.

असा रंगला सामना

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १४७ धावा केल्या. डिआंड्रा डॉटिनने शानदार कामगिरी करत सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या. केटी मॅकने ३१ आणि ताहलिया मॅकग्राने २४ धावांचे योगदान दिले. फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने सिडनी सिक्सर्सच्या दोन खेळाडूंना बाद केले. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्स संघ पूर्ण २० षटके खेळूनही १३७ धावांवर गारद झाला. एम. ब्राउनने सर्वाधिक ३४ आणि कर्णधार अ‍ॅलिसा पेरीने ३३ धावा केल्या. तर निकोल बोल्टनने गेल्या सामन्यात ३२ धावांचे योगदान दिले होते. अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सकडून वेगवान गोलंदाज डार्सी ब्राउन आणि डिआंड्रा डॉटिनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डिआंड्रा डॉटिन सामनावीर आणि अॅशले गार्डनर मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

Web Title: WBBL Final excessive sunlight stops play interruption Sydney sixers Adelaide strikers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.