इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL 2020) १३वा हंगाम नुकताच पार पडला. UAEत पार पडलेल्या आयपीएलनं कोरोना काळात क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. या लीगमध्ये डेव्हिड वॉर्नरसह अनेक परदेशी व युवा खेळाडूंनी अतरंगी फटक्यांनी सर्वांची वाहवाह मिळवली. Mr 360 एबी डिव्हिलियर्सनेही त्याच्या शैलीत फटके मारले. पण, महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये काल ब्रिस्बन हिटच्या लॉरा किमिन्सनं मारलेला अतरंगी फटका सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सिडनी सिक्सर्स वूमन संघानं प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२२ धावा केल्या. अॅलिसा हिली ( २९), डॅन व्हॅन निएकर्क ( ३१) आणि अँगे रिकेस ( २४*) यांनी दमदार खेळ केला. पण, निकोला हॅनकॉक व ग्रेस हॅरीस यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेताना सिडनी सिक्सर्सला माफक धावात रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हिटची सुरुवात निराशाजनक झाली. जेस जॉनासेन ( ३४) आणि लॉरा ( २३) यांनी चांगला खेळ करताना संघाला १७.५ षटकांत ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
किमिन्सनं मारलेला अतरंगी फटका पाहा...