Join us  

Mumbai Indians, IPL 2022 : Suryakumar yadav फिट होऊन संघात परतला, पण उद्याच्या लढतीत खेळणार का?; Zaheer Khan ने दिले अपडेट्स

Mumbai Indians, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 2:57 PM

Open in App

Mumbai Indians, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. २०१२ पासून मुंबई इंडियन्सला आयपीएलची पहिली लढत जिंकता आलेली नाही आणि याहीवेळेस तसेच घडले. दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. आता मुंबईचा दुसरा सामना शनिवारी राजस्थान रॉयल्स ( MI vs RR) होणार आहे. या लढतीपूर्वी MI चा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) तंदुरुस्त होऊन मैदानावर परतला आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला होता, पण या मालिकेत त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता. तिथून तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नुकताच परतला आणि क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून नेट्समध्ये सरावही केला. आयपीएलमध्ये त्याने ११५ सामन्यांत २३४१ धावा केल्या आहेत आणि त्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

जहीर खान काय म्हणाला?मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( MI vs RR ) यांच्यातल्या सामन्यापूर्वी जहीर खानने पत्रकार परिषद घेतली. तो म्हणाला,  इशान किशन पूर्णपणे बरा आहे आणि तो सराव सत्रातही सहभाग घेत आहे. तो उद्याच्या सामन्यात खेळेल. CCI ही सोपी विकेट नाही. इथे २००+  धावांचा सहज पाठलाग करता आला आहे. सूर्यकुमार यादव हा आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत होतो. तो आता सरावात सहभागी होणार आहे. आता त्याच्या बाबत मी इतकंच सांगू शकतो.  

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सझहीर खानसूर्यकुमार अशोक यादव
Open in App