नवी दिल्ली - नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे हा कार्यक्रम सुरू आहे. या सोहळ्यासाठी क्रिकेटसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. आज होत असलेल्या रिसेप्शन सोहळ्यासाठी विराट आणि अनुष्काने पारंपरिक पोशाख केला आहे. विराटने कोट घालता असून, अनुष्काने लाल रंगाची जरीकाम केलेली साडी परिधान केली आहे.
लग्न आणि हनिमूननंतर भारतात परतल्यावर नव्या जोडप्याच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी अनुष्काने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला असून तिच्या हातात चुडाही आहे. तर विराटने क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच पंतप्रधानांचे आशीर्वाद घेऊन त्यांना बुधवारी आयोजित केलेल्या रिसेप्शन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.