किम्बरले (द. आफ्रिका) : विश्वचषक स्पर्धेत आपली छाप पाडल्यानंतर आता सात महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत उद्यापासून सुरू होणा-या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आयसीसीच्या महिल्या चॅम्पियनशिपच्या कार्यक्रमाअंतर्गत हा दौरा महत्त्वपूर्ण मानला आहे. कारण या मालिकेतील विजेत्या संघाचे २0२१ मध्ये होणाºया विश्वचषक स्पर्धेत स्थान निश्चित होईल.
किम्बरले येथे ५ आणि ७ फेब्रुवारीला पहिले दोन एकदिवसीय सामने होतील. तिसरा आणि अखेरचा सामना १0 फेबु्रवारीला पोश्चफस्ट्रूम येथे होणार आहे. आयसीसीच्या ढिसाळ नियोजनामुळे विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय महिला संघ या सात महिन्यांत एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे आफ्रिकेसमोर त्यांचा कस लागणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे क्रिकेट रसिकांचा महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे मिताली राज आणि सहकाºयांवर अपेक्षांचे ओझे वाढलेले आहे. यासंदर्भात मिताली म्हणाली की, प्रत्येक सामन्यावर प्रशंसकांचे आणि टीकाकारांचे लक्ष असणार आहे; कारण आता क्रिकेट रसिकांना भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्तराची जाणीव झाली आहे. आमची टीम आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी उत्सुक असून, प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. मुंबईच्या १७ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्सवर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण तिने स्थानिक पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत उपविजेता असला तरी या साखळी फेरीत आमच्या संघाने आफ्रिकेच्या संघाला ११५ धावांनी धूळ चारली होती, असे ती म्हणाली.
Web Title: We are ready for the first ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.