भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) त्याच्या आक्रमक शैलीमुळे ओळखला जातो. वीरूने क्रिकेटचे मैदान दणाणून सोडले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर तो समालोचन करतानाही अनेकांची बोलती बंद करताना दिसतोय. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावून इतिहास रचला होता आणि अशा स्फोटक फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या बीग बॅश लीगमध्ये खेळण्याची ऑफरही मिळाली होती. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्यासोबत चर्चा करताना वीरूने त्याला १ लाख डॉलरची ऑफर BBL फ्रँचायझीकडून मिळाल्याचे सांगितले, परंतु त्याने त्यास नकार दिला होता.
हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले
भारतीय खेळाडू बीग बॅश लीगमध्ये खेळताना दिसतील का, असा प्रश्न गिलख्रिस्टने वीरूला केला. त्यावर त्याने गमतीशीर शैलीत उत्तर दिले, भारतीय क्रिकेटपटूंकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे त्यांना परदेशातील लीगमध्ये खेळण्याची गरज नाही.
ॲडम गिलख्रिस्ट: भारतीय खेळाडू इतर ट्वेंटी-२० लीग खेळतील, अशी वेळ येईल असे तुम्हाला वाटते का?
वीरेंद्र सेहवाग: "नाही, गरज नाही. आम्ही श्रीमंत लोक आहोत, आम्ही गरीब देशांमध्ये जात नाही (हसतो)".