Join us  

Gautam Gambhir suggested India : गौतम गंभीरचा टीम इंडियाला सल्ला, दुसरा 'कपिल देव' शोधणं थांबवा, परिस्थितीचा स्वीकार करा

Gautam Gambhir suggested India - भारतीय संघानं मागील काही वर्षांत देशा-परदेशात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल असे तगडे फलंदाज भारतीय संघाकडे आहेत, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 11:59 AM

Open in App

Gautam Gambhir suggested India - भारतीय संघानं मागील काही वर्षांत देशा-परदेशात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल असे तगडे फलंदाज भारतीय संघाकडे आहेत. त्यात भारताचा जलदगती गोलंदाजांचा मारा हा परदेशातही प्रभावी ठरला आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियात मिळवलेलं यश हे त्याची पावती आहे. तरीही भारतीय संघात एक कमकुवत बाब आहे आणि त्यावर अजूनही तोगडा निघालेला नाही. टीम इंडियाला जलदगती अष्टपैलू खेळाडू मिळालेला नाही. इरफान पठाण याच्यानंतर हार्दिक पांड्याकडून ही उणीव भरून काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, मागील ३ वर्षांपासून पाठिच्या दुखण्यामुळे त्याच्या गोलंदाजीची धार बोथट झाली. 

हार्दिक व्यतिरिक्त विजय शंकर आणि आता वेंकटेश अय्यर हे पर्यायही वापरण्यात आले. पण, अपेक्षित निकाल मिळालेला नाही. त्यात आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यानं मोठं विधान केलं आहे. भारतीय संघानं जलदगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू शोधणे बंद करायला हवे, असे मत व्यक्त केले. तो म्हणाला,''तुमच्याकडे जे नाही त्याच्या मागे पळू नका. परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जा. जे तुम्ही बनवू शकत नाहीत, ते बनवण्याचा प्रयत्न करू नका. सर्व समस्येचं मुळ हेच आहे.''

''कपिल देव यांच्यानंतर आपल्याला चांगला अष्टपैलू खेळाडू मिळालेला नाही, हे आपण सारखं बोलतो. प्रामाणिकपणे सांगतो की आपल्याला पुढे जायला हवं आणि रणजी करंडक स्पर्धेतून असे खेळाडू तयार करायला हवेत. जेव्हा तो खेळाडू तयार आहे असे वाटेल, तेव्हा त्याला थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी द्यायला हवी. बीसीसीआयनं आता स्थानिक क्रिकेट, भारत अ क्रिकेटमधून युवा खेळाडूंचा शोध सुरु करायला हवा,''असे गंभीरला वाटते.  

२०१९ ला पाठिवरील शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पांड्यानं फार गोलंदाजी केलेली नाही. त्याच्या तंदुरुस्तीचा परिणाम फलंदाजीवरही जाणवत आहे. त्याच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूर हा पर्याय समोर आला. परंतु, त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फार अनुभव नाही. त्यामुळे हार्दिकची जागा तो भरून काढेल, असा अंदाज बांधणे घाईचे ठरेल. वेंकटेश अय्यरलाही अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. 

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्या
Open in App