Join us  

'आम्ही खूप निराश आहोत, पण'; ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्याआधी विराट कोहलीची भावनिक पोस्ट

Virat Kohli: उपांत्यफेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्यासाठी रवाना झाले आहेत.

By मुकेश चव्हाण | Published: November 11, 2022 11:37 AM

Open in App

T20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स अत्यंत निराश झाले आहेत. कारण, या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय संघाला तब्बल 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 

पराभवानंतर संघात फेरबदल; सिनियर खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता, रोहितचाही समावेश?

जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. एडिलेडवर मोठ्या संख्येने भारतीय फॅन्स उपस्थित होते आणि हार्दिक त्यांना चिअर करण्यासाठी उत्साहित करत होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष दिसला. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांना गप्प केले. इंग्लंडच्या सालमीवीरांनी भारताला स्पर्धेबाहेर फेकले आणि 15 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न अपूर्ण राहिले. 

'भारतीय संघाच्या पराभवानंतर तो व्यक्ती सर्वात आनंदी'; सोशल मीडियावर Memesचा धुमाकूळ, पाहा फोटो

उपांत्यफेरीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून मायदेशी येण्यासाठी रवाना झाले आहेत. भारतात दाखल होण्याआधी विरोट कोहलीने एक भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये सध्या आम्ही खूप निराश आहोत, परंतु आम्ही एक संघ म्हणून बरेच अविस्मरणीय क्षण परत घेऊ शकतो आणि येथून पुढे चांगले होण्याचे ध्येय ठेवू शकतो. मैदानात आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व चाहत्यांचे आभार. तसेच भारताची जर्सी घालून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना नेहमीच अभिमान वाटतो, असं विराटने म्हटलं आहे. 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या हार्दिक पांड्यानेही ट्विट केलं आहे. मी निराश झालोय. दुखावलोय. मला खूप धक्का बसलाय, असं हार्दिकने म्हटलं आहे. तसेच मॅचचा असा अंत स्वीकारणं सर्वांसाठीच कठीण आहे. माझ्या टीममेटसोबत जे नातं तयार झालंय, ते खूप जवळून अनुभवलं. प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकमेकांसाठी लढलो. खरं तर जे झालं, हो घडायला नको होतं. पण ही लढाई सुरूच राहील, असंही हार्दिक पांड्याने म्हटलं आहे.

भारतीय संघाचा फलंदाज सुर्यकुमार यादवनेही ट्विट केलं असून त्यांने संघातील खेळाडूंचे, व्यवस्थापनाचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, भारताच्या या पराभवानंतर आता टी-20 संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टी-20 संघात असलेल्या सिनियर खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, फिरकी गोलंदाज आर. अश्विन, दिनेश कार्तिक आणि फलंदाज विराट कोहलीचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. तसेच रोहित आणि विराटला भविष्यात टी-20 सामने खेळायचे की नाही, हा निर्णय त्यांनाच घ्यायला बीसीसीआयकडून सांगितले जाऊ शकते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :विराट कोहलीभारतविश्वचषक ट्वेन्टी-२०हार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव
Open in App