IPL Cheerleader Confesses About The Dirty Secrets Of IPL : २००८ मध्ये इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात झाली अन् क्रिकेटचा चेहराच बदलला... ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या या लीगनं अल्पावधीतच जगाचे लक्ष वेधले.. पैसा, ग्लॅमर, चीअर लीडर्स असा संपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज आयपीएलमधून क्रिकेट चाहत्यांना मिळू लागला. पण, या झगमगाटामागे एक काळा चेहराही होता अन् मुंबई इंडियन्सची चीअर लीडर्स गॅब्रिएला पासक्यूलोट्टो ( Gabriella Pasqualotto ) हीनं तो समोर आणला. २०११मध्ये गॅब्रिएलानं लिहिलेला ब्लॉग तुफान व्हायरल झाला अन् त्यानंतर आयपीएलच्या पार्ट्यांमध्ये चीअर लीडर्सना कशी वागणूक दिली जाते हेही समोर आलं.
चालत्या फिरत्या पॉर्न स्टार, अशी आमची अवस्था झाली होती... गॅब्रिएलच्या या वाक्यातून आयपीएल पार्ट्यांमधील डर्टी सत्य समोर आलं... मुळची दक्षिण आफ्रिकेची असलेली गॅब्रिएला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची चीअर लीडर होती. तिने लिहिलेल्या ब्लॉगमधील आयपीएलची काळी बाजू समोर आली. गॅब्रिएलाने लिहिलं होतं, आम्ही अक्षरक्ष: वॉकिंग पॉर्न सारख्या झाल्या आहोत. हे क्रिकेटपटू अतिशय चारित्र्यहीन आणि खोडसाळ आहेत. असभ्य वर्तन करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावंही तिने लिहिली होती.''
गॅब्रिएलाच्या ब्लॉगमुळे काही खेळाडूंची गोपनीयता धोक्यात आली आहे असं वृत्तांकन दक्षिण आफ्रिकेतील प्रसारमाध्यमांनी केलं. कारण याप्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचं नाव समोर आलं होतं. त्या हंगामादरम्यान मुंबई इंडियन्सने गॅब्रिएलाचा करार रद्द केला होता. त्याचवेळी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे अतिशय चांगले वागतात, ते त्यांच्या विश्वात असतात असंही गॅब्रिएलाने लिहिलं होतं. भारताचा माजी कर्णधार धोनी नम्र आहे. सचिन तेंडुलकर हा आयपीएलच्या पार्टींमध्ये खूप कमी वेळा दिसला, असे म्हणत तिने मास्टर ब्लास्टरचेही कौतुक केले होते.