शेतकरी आंदोलन व क्रिकेटपटूंनी व्यक्त केलेलं मत, यावरच गुरुवारी दिवसभर चर्चा रंगली. शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हीनं ट्विट काय केलं, भारतीय क्रिकेटपटूंनी एका आशयाच्या ट्विटचा सपाटा लावला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, प्रग्यान ओझा यांनी रिहानाचं नाव न घेता तिला अप्रत्यक्ष सुनावले. भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत, हा समान संदेश देणारे ट्विट या सर्व क्रिकेटपटूंनी केले. हे असे कसे घडले, यामागचं गुपित टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं सांगितले. जॉर्ज फ्लॉइडची अमेरिकेत हत्या झाली तेव्हा भारतीयांनीही दुःख व्यक्त केले; इरफान पठाणचा 'यॉर्कर'
भारतविरुद्ध इंग्लंड ( India vs England) यांच्यात पहिला कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाची गुरुवारी बैठक पार पडली आणि त्यात शेतकरी आंदोलनावर चर्चा झाल्याचे विराटनं सांगितलं. तो म्हणाला,''देशातील चालू घडामोडींवर आम्ही नेहमी चर्चा करतो आणि प्रत्येकजण त्यावरील आपलं मत मांडतो. तशीच चर्चा शेतकरी आंदोलनावरही आज झाली आणि त्यानंतर प्रत्येकानं सोशल मीडियावर त्यांची मत मांडली. '' भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत आपले अंतर्गत प्रश्न शांततेने सोडवू शकतो, असे अनिक कुंबळे यांनी म्हटले आहे.
विराट कोहलीने लिहिलं आहे की, "मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ असं त्याने म्हटलं आहे.
सलामीवीर शिखर धवनने ट्विट करत म्हटलं आहे, “एका निष्कर्षापर्यंत पोहोचणे सध्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या भविष्यासाठी आपण एकत्रीतपणे पुढे चालूया.
''देशानं एकत्र येऊन हा प्रश्न आज किंवा उद्या सोडवू, परंतु याचा अर्थ देशात फूट पडलीय असा होत नाही. चर्चेनं सर्व प्रश्न सुटतील,''असे सुरेश रैनानं ट्विट केलं.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, भारताच्या आर्थिक जडणघडणीत कृषीक्षेत्राचे मोठे योगदान आहे. शेतकरी हे देशाचा पाठीचा कणा आहेत. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो चर्चेनं लवकरच सोडवण्यात येईल, अशी मला खात्री आहे.
अजिंक्य रहाणे म्हणाला की, आपण सर्व एकत्र उभे राहिलो तर सर्व प्रश्न सोडवले जाऊ शकतात. चला तर मग एकजूट राहूया आणि अंतर्गत प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं काम करूया.