पैशासाठी नव्हे, क्रिकेट सुरू करण्यासाठी आलो

इंग्लंड दौऱ्याबाबत विंडीज कर्णधार होल्डरची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:55 AM2020-06-12T03:55:08+5:302020-06-12T03:55:32+5:30

whatsapp join usJoin us
We came to start cricket, not for money | पैशासाठी नव्हे, क्रिकेट सुरू करण्यासाठी आलो

पैशासाठी नव्हे, क्रिकेट सुरू करण्यासाठी आलो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : कोरोनाच्या प्रकोपात केवळ पैसे कमावण्यासाठी इंग्लंड दौºयावर आलेलो नाही. क्रिकेट सुरू व्हावे यादृष्टीने परिस्थिती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने व्यक्त केले. ब्रिटनने कोरोनामुळे आतापर्यंत ४० हजार नागरिक गमावले आहेत तर कॅरेबियन देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या नगण्य आहे. ‘आमच्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही तर सुरक्षेची हमी महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंड दौरा मौजमस्तीसाठी नाहीच.

क्रिकेटची सुरुवात करण्यासाठी उचलण्यात आलेले वास्तविक पाऊल आहे. तुम्ही स्वत:ला कोविडयोद्धा म्हणून पाहत असाल तर घरी बसून व्हायरसपासून दूर राहण्याची संधी मिळणार नाही. याच हेतूने पुढाकार घेत आम्ही क्रिकेट सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहोत,’ असे होल्डरने सांगितले. वेस्ट इंडिज संघ ओल्ड ट्रॅफोर्ड येथे विलगीकरणात असून तीन आठवडे येथेच सराव करणार आहे. हॅण्ड सॅनिटायझर, युज अ‍ॅण्ड थ्रो ग्लोव्हज आणि थर्मामीटरची येथे मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

आमचा येथे येण्याचा उद्देश पैसा कमावणे नसून आरोग्याशी कुठलाही समझोता करणार नाही. क्रिकेट सुरू व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. आम्ही ‘बळीचा बकरा’ बनावे, असा समज करू नका. यंदा उन्हाळ्यात इंग्लंड दौरा आधीच प्रस्तावित होता. आम्ही दौºयाचे प्रयत्न सुरू ठेवले. येथे खेळता येईल, याची खात्री पटताच दौºयावर आलो आहोत.
-जेसन होल्डर

Web Title: We came to start cricket, not for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.