Join us  

Shoaib Akhtar : आम्ही अनेक जनावरं खातो, म्हणून सिंहासारखे धावतो; India vs Pakistan गोलंदाजांची तुलना करताना शोएब अख्तर बरळला 

Shoaib Akhtar on difference in India and Pakistan pacers - पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याच्या मते पाकिस्तानी जलदगती गोलंदाज हे भारताच्या गोलंदाजांच्या तुलनेत वरचढ आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 2:59 PM

Open in App

Shoaib Akhtar on difference in India and Pakistan pacers - पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याच्या मते पाकिस्तानी जलदगती गोलंदाज हे भारताच्या गोलंदाजांच्या तुलनेत वरचढ आहेत. अख्तरनं ही गोष्ट समजावून सांगताना पाकिस्तानचा पेस अटॅक कसा सर्वोत्तम आहे, यासाठी काही उदाहरण दिले. ४६ वर्षीय अख्तर मागील काही वर्ष भारतीय जलदगती गोलंदाजांचे कौतुक करतोय, पण जेव्हा पाकिस्तानी गोलंदाजांशी तुलनेचा प्रश्न आला तेव्हा त्यानं त्याच्या देशातील गोलंदाजांमध्ये अधिक ऊर्जा असल्याचे म्हटले.

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबत बोलातना अख्तरनं हे विधान केलं. तो म्हणाला,'' भारत आणि पाकिस्तान यांच्या जलदगती गोलंदाजांमध्ये बराच फरक आहे. भारतातून चांगले जलदगती गोलंदाज येत आहेत, परंतु त्यांच्याकडे ती खास प्रकारची ऊर्जा नाही. ते चेहऱ्यावर राग दाखवत नाही. तो अॅटिट्यूड आमच्या गोलंदाजांमध्ये दिसतो. त्यांच्या चेहऱ्यावरच तो राग असतो जो फलंदाजांना सांगतो की आता मी तुझा जीव घेईन.''

या गोष्टीला त्यानं पाकिस्तानातील वातावरण आणि खाण्या-पिण्याच्या सवई कारणीभूत असल्याचे सांगितले. तो म्हणाला,''आमच्याकडीलल वातावरण, अन्न आणि अॅटिट्यूड आम्हाला असं बनवतं. त्यामुळे आमचे गोलंदाजांमध्ये सतत एनर्जी दिसेल. त्यामुळे जलदगती गोलंदाजांनाही वेगळा आनंद मिळतो. पाकिस्तानचे खेळाडू स्ट्रीक्ट नॉन-व्हेज डाएट फॉलो करतात. जे तुम्ही खाता, तसंच तुम्ही बनता, हे खरं आहे ना?; आमच्या देशात अनेक जनावरं खाल्ली जातात आणि आम्हीपण जनावरांसारखेच बनलो आहोत. त्यामुळेच जेव्हा जलदगती गोलंदाजी करण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही सिंहासारखे पळतो.''   

भारत-पाकिस्तान हे पुन्हा T20 World Cup 2022 स्पर्धेत भिडणार आहेत. २०२१मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं प्रथमच भारताला पराभूत केले होते आणि आता पुन्हा तोच निकाल लागेल, असा दावा अख्तरनं केला आहे. 

टॅग्स :शोएब अख्तरभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App