मुंबई : अंबाती रायुडूला विश्वचषकात संधी न दिल्यामुळे साऱ्यांनीच निवड समितीवर ताशेरे ओढले होते. विश्वचषकात जेव्हा शिखर धवन दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हा रायुडूला संधी मिळेल, असे वाटत होते. पण त्यावेळी पंतला संघात स्थान देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच रायुडूने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र, आम्ही रायुडूची बाजू घेतली आहे, असे म्हटले आहे.
रायुडूबद्दल प्रसाद म्हणाले की, " जेव्हा एखाद्या खेळाडूला आम्ही निवडतो आणि तो चांगली कामगिरी करतो तेव्हा आम्हालाही आनंद होतो. त्याचबरोबर जेव्हा आम्ही एखाद्या खेळाडूची निवड करू शकत नाही, तेव्हा आम्हालाही वाईट वाटते. पण आम्ही रायुडूबाबत पक्षपातपणा केला नाही."
प्रसाद पुढे म्हणाले की, " जेव्हा आम्ही रायुडूला आयपीएलच्या कामगिरीवरून संघात स्थान दिले होते, तेव्हा आमच्यावर टीका झाली होती. त्याचबरोबर भारतीय संघ जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर होता तेव्हा रायुडू हा यो-यो टेस्टमध्ये नापास झाला होता. त्यावेळी आम्ही त्याच्यासाठी खास एका महिन्याचा फिटनेस कार्यक्रम बनवला होता. "
तब्बल दीड वर्षांनी त्याने भारतीय संघात केले पुनरागमनमुंबई : भारतीय संघाची आज वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी निवड करण्यात आली. यावेळी काही जणांना डच्चू मिळाला तर काहींना नव्याने संधी मिळाली. पण या संघात एका खेळाडूला चक्क दीड वर्षांनी संघात स्थान मिळाले आहे. आता हा खेळाडू नेमका कोण, याचा विचार तुम्ही करत असाल.
या मालिकेमध्ये आपण खेळणार नसल्याचे विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी निवड समितीला कळवले होते. पण कोहलीने मात्र आपण या मालिकांसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. धोनी संघात नसताना रिषभ पंतला संघात यष्टीरक्षक म्हणून कायम राहीला. पण दिनेश कार्तिकला मात्र संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे कार्तिकची कारकिर्द धोक्यात आल्याचे आता म्हटले जात आहे.
या मालिकांमध्ये खेळणार नसल्याचे धोनीने सांगितले होते. त्यामुळे ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघात पंतची निवड करण्यात आली. पण कसोटी संघात मात्र पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. ही जबाबदारी वृद्धिमान साहाकडे सोपवण्यात आली आहे. तब्बल दीड वर्षांनी साहाने संघात पुनरागमन केले होते. दीड वर्षांपूर्वी साहाला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे आता त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समिती अध्यक्ष काय म्हणाले, वाचा...मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन मालिकांसाठी आज भाताचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी आपण उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. पण विश्वचषकातील पराभवानंतर विराटचे धाबे दणाणले आणि त्याने या मालिकांमध्ये खेळायचा निर्णय घेतला. पण धोनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहीला. धोनी नसल्यामुळे रीषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. धोनी लवकरच निवृत्त होणार, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. याबाबत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आज भाष्य केले आहे.
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तीन टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केली. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने पुनरागमन केले आहे. तर विंडीज दौऱ्यातून माघार घेणाऱ्या धोनीला पर्याय म्हणून रीषभ पंतची निवड करण्यात आली आहे.