बंगळुरु : ‘मी माझा खेळ चांगल्याप्रकारे समजून आहे. या जोरावरच मी आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचाइजी क्रिकेटमध्ये यश मिळवू शकलो. आता आमचे लक्ष्य चेन्नईमध्ये पहिल्या क्वालिफायर लढतीकडे लागले आहे. येथे खेळण्यासाठी आमच्याकडे चांगली गोलंदाजी असून थेट अंतिम फेरी गाठण्याची आशा आहे,’ असा विश्वास गुजरात टायटन्सचा स्टार सलामीवीर शुभमन गिल याने व्यक्त केला.
रविवारी गुजरातने अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) नमवून त्यांना स्पर्धेबाहेर केले. या सामन्यात गिलने नाबाद शतक ठोकत गुजरातच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली होती. या सामन्यानंतर गिलने म्हटले की, ‘कोणत्याही खेळाडूला स्वत:चा खेळ समजून घेणे महत्त्वाचे ठरते. या जोरावरच तो यशस्वी ठरू शकतो.’
गुजरातला चेन्नईत पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध खेळायचे आहे. याविषयी त्याने सांगितले की, ‘माझ्या मते, चेन्नईच्या खेळपट्टीकडे पाहता आमच्याकडे खूप चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. चेन्नईमध्ये चन्नईविरुद्ध खेळणे रोमांचक ठरेल. आशा आहे की, आम्ही सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करू.’
Web Title: We have great bowling for Chennai: Gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.