अहमदाबाद : ‘माझा संघ खेळपट्टीची तक्रार करण्यापेक्षा परिस्थितीनुरुप खेळल्यामुळे यशस्वी होत आहे, हेच आमच्या यशाचे रहस्यदेखील आहे. आम्ही कुठल्याही खेळपट्टीवर खेळत असू, त्या खेळपट्टीची कधीही तक्रार केली नाही. याच वृत्तीने पुढेही खेळत राहणार आहोत,’ असे भारतीय कर्णधार विराट कोहली याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीआधी बुधवारी स्पष्ट केले.
तिसरा कसोटी सामना दोन दिवसात संपल्यानंतर खेळपट्टीवरून बरीच चर्चा होत आहे. इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी वारंवार टीकाही केली. याचा समाचार घेत कोहली म्हणाला,‘ खेळपट्टीवर टीका बंद करा आणि बचावात्मक फलंदाजीचे तंत्र आणखी मजबूत करायला शिका. एकच गोष्ट वारंवार उच्चारण्याऐवजी प्रामाणिक खेळ सुधारण्यावर भर द्या. एकतर्फी बोलणे टाळले पाहिजे,’ या शब्दात विराटने इंग्लंडच्या माजी दिग्गजांचे कान टोचले.
फिरकीला पोषक असलेल्या भारतातील खेळपट्ट्यांवर अलिकडे फारच टीका केली जाते. आमची माध्यमे केवळ खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर देत असतील आणि अशा गोष्टी अनावश्यक आहेत, असे सांगत असतील तर माझ्यामते ही चर्चा संतुलित असेल, असा मला विश्वास आहे.’
तिसऱ्या कसोटीतील अपयशासाठी कोहलीने फलंदाजीचे तंत्र दोषी असल्याचे सांगितले. तो म्हणाला,‘अपयशानंतर फिरकी खेळपट्टीवर खापर फोडले जाते. प्रसिद्धी मिळेपर्यंत ही रेकॉर्ड सुरूच ठेवली जाते. एखादा कसोटी सामना चौथ्या किंवा पाचव्या दिवशी जिंकल्यास चर्चा होत नाही; मात्र दोन दिवसात सामना जिंकला की अनेक जण मुद्दे उपस्थित करतात.’
n न्यूझीलंडमध्ये भारताने गमावलेल्या एका सामन्याचे उदाहरण देत विराट म्हणाला, ‘वेगवान गोलंदाजांना पोषक त्या खेळपट्टीवर आम्ही चाचपडलो होतो. तिसऱ्याच दिवशी ३६ षटकांत आम्ही पराभूत झालो, त्यावेळी खेळपट्टीची नव्हे तर फलंदाजी तंत्राची चर्चा रंगली. आमच्या माध्यमांनीही खेळपट्टीवर लिहिले नव्हते. भारताचे फलंदाज खराब खेळले, इतकेच लिहिण्यात आले होते. खेळपट्टीवर किती गवत होते, चेंडू कसा उसळी घेत होता, याबाबत आम्हीदेखील बोललो नाही. आम्ही तक्रार करण्याऐवजी परिस्थितीवर मात करण्याचे शिकलो आहे. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकलो.’

Web Title: ‘We succeeded because we didn’t cry’
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.