किंगस्टन : जगभरात वर्णभेदाचा सामना करावा लागलेल्या कृष्णवर्णीय लोकांसाठी आदर आणि समानतेचे अपील करताना वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने म्हटले की, ‘खूप झाले आता’. अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीची अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याने निर्घृण हत्या केल्याने जगभरात तीव्र पडसाद उमटले.
‘जगात सध्या जे सुरू आहे ते दु:खद आहे. कृष्णवर्णीय असल्याने आम्हाला कृष्णवर्णीय लोकांचा इतिहास माहीत आहे. आम्ही कधीही वचपा घेण्याची भाषा केली नाही, आम्ही केवळ समानता आणि आदराची भाषा करतो. आम्ही दुसऱ्यांचा आदर करतो. तरीपण आम्हाला अशा गोष्टींचा सामना का करावा लागतो? आता खूप झाले. आम्हाला केवळ समानता हवी. ‘सन्मान मिळण्याची आमची इच्छा आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये प्रेम देतो आणि त्याचे समर्थन करतो,’ असे ब्रावो म्हणाला.