रांची : पाच सामन्यांच्या सध्याच्या कसोटी मालिकेत भारताच्या तुलनेत आम्ही स्पर्धेत कुठेही नव्हतो. त्यामुळे प्रत्युत्तर देणे कठीण जात असले तरी कडवे आव्हान देणाऱ्या खेळाडूंवर मला गर्व वाटतो, असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने म्हटले आहे.
चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाच गड्यांनी विजय नोंदवून भारताने मालिका ३-१ अशी जिंकली. पाचवा सामना धर्मशाला येथे ७ मार्चपासून खेळला जाईल. स्टोक्स कर्णधार आणि ब्रेंडन मॅक्युलम कोच बनल्यापासून इंग्लंडने ही पहिलीच मालिका गमावली.
स्टोक्स म्हणाला, ‘३-१ ने पराभव चांगला वाटत नाही. त्याचवेळी भारताला ज्या पद्धतीने आम्ही टक्कर दिली त्यावर गर्व वाटतो. भारतासोबत स्पर्धा करण्याची आमच्याकडे संधीदेखील नव्हती. तरी सोमवारी आम्ही यजमान संघाला सहज विजय सोपविलेला नाही. माझ्या मते प्रतिस्पर्धी संघदेखील हे कबूल करू शकतो.’
Web Title: We were not competitive compared to India; Ben Stokes: I am proud of the players who put up a tough challenge
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.