- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
तीन वर्षांत आयपीएलच्या अंतिम फेरीत दोन वेळा पोहोचणे नक्कीच आनंददायी आहे. एक माजी खेळाडू म्हणून बाद फेरीच्या सामन्यांमध्ये माझाही सहभाग असल्याने मला एक वेगळाच तणाव अनुभवायला मिळाला. असाच काहीसा ताण जेव्हा मी खेळत होतो तेव्हा जाणवत होता.सनरायझर्स हैदराबादच्या संघाने क्वालिफायर २ च्या सामन्यात दाखवलेला दृष्टिकोन आणि त्यांची मानसिकता पाहून मला आनंद झाला. चेन्नई सुपर किंग्जकडून क्वालिफायर १ च्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर खेळाडूंनी वैयक्तिकरीत्या आणि सांघिकरीतीने केलेले पुनरागमन महत्त्वाचे ठरले. पण त्यांचा शांतपणा आणि शिस्त महत्त्वाची ठरली. मुंबईहून कोलकात्याला आल्यावर आम्ही वृद्धिमान साहाच्या मुलीचा वाढदिवस साजरा केला. त्यात सर्व जण आनंदाने सहभागी झाले होते. आम्ही राजस्थान आणि केकेआर यांचा सामना मोठ्या स्क्रीनवर पाहिला आणि खेळाडूंच्या सहजतेने मी चकीत झालो. त्यांना एकमेकांविषयी जिव्हाळा वाटतो.आम्ही कोलकाता नाईट रायडर्स विरोधातील सामन्याच्या आधी सायंकाळी ऐच्छिक सराव केला. आम्ही कोलकाता नाईट रायडर्सचा ईडनगार्डन्सवर पराभव करू शकलो नव्हतो. त्यांनी या सत्रात दोन वेळा मिळवलेला विजय मोठा आणि महत्त्वाचा होता.संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षक कोलकात्याच्या बाजूने होते. त्यांना समर्थन देत होते. आम्हाला फक्त आमचे संघ सहकारी आणि कुटुंबाचा पाठिंबा होता. पण आम्ही सामन्यातील सर्वच सत्रात आमचे वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी ठरलो. मला वाटले होते, की इडनगार्डन्सची खेळपट्टी ही उत्तम होती. मग ती गोलंदाजांसाठी असो की फलंदाजांसाठी, शिखर धवनने चांगला खेळ केला. साहाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आणि सूजही आली होती. त्यांनी आम्हाला १९०-१८० धावा करण्यासाठी चांगली सुरुवात करून दिली होती. पण अचानक आमचे गडी सलग बाद झाले. त्यामुळे आम्ही १४० धावाच करू शकलो असतो. पण राशिद खान आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्याचे अफलातून फटके संघासाठी काहीतरी करण्याच्या विश्वासातून आणि इच्छेतून आले होते. हाच आमचा या सत्रातील उद्देश होता आणि आमच्यातील एक स्टार खेळाडू मोठ्या व्यासपीठावरून दमदार खेळी करीत आहे हे पाहणे नक्कीच उल्लेखनीय होते. आम्ही केकेआरचे सलामीचे फलंदाज लवकर बाद करू शकलो नाही. नरेन आणि लीन यांच्या खेळीमुळे सामना आमच्या हातून जातो की काय, अशी भीती होती.पण आम्ही आशा सोडली नाही. केन विल्यम्सनचे आक्रमक नेतृत्व आणि त्याने आम्ही ठरवलेल्या रणनीतीपेक्षा वेगळी रणनीती अमलात आणत केकेआरला सामन्यातून दूर नेले. लीनला स्विप मारायला भाग पाडले. तर रसेलसाठी स्लिपची रणनीती महत्त्वाची ठरली. त्याचे नेतृत्व उत्तम आहे आणि गोलंदाजांचा वापर कसा करावा, याचे उदाहरणच त्याने समोर ठेवले. मला विश्वास आहे, की आमचा संघ चेन्नई विरोधात अंतिम सामन्यात चांगली लढत देईल. खेळाडूंनी आमचे अभियान ज्या पद्धतीने पुढे नेले त्यावर मला अभिमान आहे.