ठळक मुद्देबीसीसीआयच्या एका निर्णयामुळेच हा सामना न खेळवण्याच्या निर्णयापर्यंत मध्यप्रदेश क्रिकेट संघटना आली आहे.
नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजचा संघ सध्याच्या घडीला भारताच्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामना इंदोर येथील होळकर स्टेडियमवर होणार होता. पण मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेने मात्र हा सामना आम्ही खेळवणार नाही असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि बीसीसीआयमध्ये तेढ निर्माण झाली आहे. पण मध्यप्रदेश संघटना हा सामना खेळवण्यास का तयार नाही, हे तुम्हाला माहिती आहे का...
देशातील प्रत्येक क्रिकेट संघटनेला आपल्या स्टेडियममध्ये सामना व्हावा, असे वाटत असते. पण मध्यप्रदेश क्रिकेट संघटना हा सामना नाकारताना दिसत आहे. ते हा सामना बीसीसीआयमुळेच नाकारत आहेत, असे ऐकले तर तुम्हाला धक्का बसेल. पण ही खरी गोष्ट आहे. बीसीसीआयच्या एका निर्णयामुळेच हा सामना न खेळवण्याच्या निर्णयापर्यंत मध्यप्रदेश क्रिकेट संघटना आली आहे.
नवीन नियमांनुसार स्टेडियमच्या आसन क्षमतेच्या 10 टक्के तिकीटाच यजमानांना ठेवता येतील, असा नवीन नियम करण्यात आला आहे. होळकर स्टेडियमची क्षमता 27,000 आहे. त्यानुसार यजमानांना 2700 तिकिट्स मिळू शकतील. पण बीसीसीआयने या दहा टक्क्यामधील काही हिस्सा मागितला आहे आणि त्यामुळेच मध्यप्रदेश संघटनेने सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Title: '... we will not host India-West Indies one day match'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.