रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सघ्या भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात पहारा देत आहे. 31 जुलैला काश्मीर खोऱ्यातील 106TA बटालियन (पॅरा) सोबत रूजू झाला होता. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत तो बटालियनसोबत राहणार आहे. भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली आहे. पण, पत्नी साक्षीला एका कारणामुळे धोनीची प्रचंड आठवण येत आहे.
धोनी येत्या 15 ऑगस्टला लडाखमधील लेह येथे झेंडावंदन करण्याची शक्यता असल्याचे समजते. तसेच धोनी भारतीय सेनेचा ब्रँड अॅम्बेसेडर असून युनिटमधील सदस्यांना तो प्रेरित करतो असे भारतीय सेनेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देत आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे.
यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली.
कॅप्टन कूल धोनी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना पत्नी साक्षीला माहीची आठवण येत आहे. त्यात धोनीच्या घरी लाल जीप ग्रँड चेरोकी दाखल झाली आहे. धोनीच बाईक्स आणि कारवरील प्रेम हे जगजाहीर आहे. त्यामुळे ही नवीन जीप धोनीच्या घरी दाखल झाली, त्यावेळी साक्षीला माहीची आठवण आली. तिनं या नवीन सदस्याचे स्वागत केले आणि missing you माही अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. धोनीच्या ताफ्यात दाखल झालेल्या या जीपची किंमत ही जवळपास 79 लाख इतकी आहे.
Web Title: Welcome home Jeep Grand Cherokee! Your toy is finally here mahi really missing you, post sakshi on instagram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.