Join us  

भारतीय क्रिकेटपटू झाला 'बाप माणूस'; सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

सोशल मीडियावर पत्नी व मुलीसह केला फोटो पोस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 2:10 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात देशातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटसह अन्य क्रीडा स्पर्धाही बंद आहेत. कोरोनामुळे खेळाडूंना आपापल्या घरीच रहावे लागत आहे. कोरोनाच्या संकटात आजूबाजूचं वातावरण नकारात्मक होत असताना भारतीय गोलंदाजांनं गुड न्यूज दिली. भारताचा गोलंदाज रिषी धवन याला पुत्ररत्न प्राप्ती झाली असून त्यानं सोशल मीडियावरून ही गोड बातमी सांगितली. त्यानं मुलगा व पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

धवनने भारताकडून 2016मध्ये तीन वन डे आणि एक ट्वेंटी -20 सामना खेळला आहे. हिमाचल प्रदेशकडून तो स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो. धवननं 79 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3702 धावा आणि 308 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 96 सामन्यांत त्याच्या नावावर 125 विकेट्स आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यानं किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017पासून तो एकही ट्वेंटी-20 सामना खेळलेला नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी धवनने लॉकडाऊनचा नियम मोडल्याचे वृत्त समोर आले होते. हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय क्रिकेटपटू रिषी धवननं लॉकडाऊनचा नियम मोडला. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केले. लॉकडाऊन असताना रिषी धवन खाजगी वाहनानं बाहेर पडला होता आणि पोलिसांनी त्याला अडवून पावती फाडली. हिमाचल प्रदेशमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारस धवन गाडी घेऊन घराबाहेर पडला होता, परंतु त्याच्याकडे पास नसल्यानं पोलिसांनी त्याच्याकडून 500 रुपयांची पावती फाडली. तो बँकेत जात होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक; त्या एका फुटबॉल सामन्यामुळे 41 जणांचा कोरोनानं मृत्यू

OMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट!

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरीही मालिका रद्द होता कामा नये; राहुल द्रविड

पाकिस्तानच्या प्रशिक्षकानं सुचवला जुगाड; चेंडूला थूंकी लावण्याची गोलंदाजांची मोडेल सवय!

युवी, भज्जीकडे मदत मागायची अन् त्यांच्या पंतप्रधानांवर टीका करायची; आफ्रिदीवर पाक खेळाडू बरसला

कृपया ऑस्ट्रेलियाविरुद्ध नको! ब्रेट लीनं केली रोहित शर्माकडे Special विनंती

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकोरोना वायरस बातम्या