पोत्चेफस्ट्रूम : शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला ७ बळींनी नमवत पहिल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, महिला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताचे हे पहिले विश्वविजेतेपद ठरले.
वरिष्ठ स्तरावर भारतीय संघाला तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी पहिला विश्वचषक पटकावून दिला.
भारतीयांनी इंग्लंडला १७.१ षटकांत केवळ ६८ धावांमध्ये गुंडाळले. यानंतर, आवश्यक ६९ धावा तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १४ षटकांत पार करत भारतीय मुलींनी शानदार विश्वविजेतेपद पटकावले.
भारतीय खेळाडूंची छापसर्वाधिक धावा :nश्वेता सेहरावत (भारत) : २९७ धावाnग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) : २९३ धावाnशेफाली वर्मा (भारत) : १७२ धावाnइमान फातिमा (पाकिस्तान) : १५७ धावाnजॉर्जिया प्लिमर (न्यूझीलंड) : १५५ धावा.सर्वाधिक बळी : nमॅगी क्लार्क (ऑस्ट्रेलिया) : १२ बळीnपार्श्वी चोप्रा (भारत) : ११ बळीnहॅना बेकर (इंग्लंड) : १० बळीnअनोसा नासिर (पाकिस्तान) : १० बळीnग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) : ९ बळी