T20 World Cup, David Warner : ट्वें-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद हाफिज याच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार सर्वाधिक चर्चेत राहिला. हाफिजनं टाकलेला चेंडू दोन टप्पा खात वॉर्नरच्या दिशेनं गेला अन् ऑसी सलामीवीरांनी खेळपट्टी सोडून तो चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावला. या फटक्यावरून वॉर्नरच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले गेले, परंतु अनेकांनी त्याची पाठराखणही केली. आता वॉर्नरनं हा फटका हिट केल्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये तसा प्रयोग होणार नाही, असं होईल का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि त्यात गोलंदाजाच्या हातून निसटलेला चेंडू टोलावण्यासाठी फलंदाज खेळपट्टीसोडून बराच बाहेर जातो, पण जे वॉर्नर करू शकतो ते सगळ्यांनाच जमेल असे नाही. बघा काय घडलं पुढे ते...
ऑस्ट्रेलियानं पहिले ट्वेंटी-२० आणि सहावे विश्वविजेतेपद नावावर केले. न्यूझीलंडचे १७३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. किवींकडून कर्णधार केन विलियम्सन एकटा खेळला, तर ऑसींसाठी डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांची बॅट तळपली. वॉर्नरनं अर्धशतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाचा पाया रचला आणि त्यावर मिचेल मार्शनं कळस चढवला. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ( Man of the Tournament) वॉर्नरनं नावावर केला. वॉर्नरनं या स्पर्धेत २८९ धावा केल्या आणि त्याला आयसीसीनं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला.
व्हायरल झालेला व्हिडीओ पाहा...
Web Title: Went to copy David Warner did against Pakistan and the batsman became a jocker, watch the funny video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.