इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याने वन डे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तीनही फॉरमॅटला एकाच वेळी समान न्याय देऊ शकत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे स्टोक्सने जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या अखेरच्या वन डे सामन्यात स्टोक्सला 5 धावाच करता आल्या. पण, त्याने निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ( ICC) कान टोचले. खेळाडू म्हणजे कार नव्हे, भरलं पेट्रोल अन् पळवली गाडी, असं विधान करून स्टोक्सने सततच्या क्रिकेटवर अप्रत्यक्षितपणे आक्षेप घेतला. स्टोक्सने 105 वन डे सामन्यांत 3 शतकं व 21 अर्धशतकांसह 2924 धावा केल्या आहेत.
तो म्हणाला,''हा निर्णय घेणे सोपं नक्कीच नव्हतं, परंतु आता कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे आणि भविष्यात बरंच क्रिकेट खेळायचं आहे. त्यासाठी तंदुरुस्त राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण मला शक्य तितकं जास्त क्रिकेट खेळायचे आहे. जीमी ( James Anderson) आणि ब्रॉडी ( Stuart Broad) यांनी मर्यादित षटकांचं क्रिकेट सोडल्यानंतर ते बरेच वर्ष खेळत आहेत. मलाही 140-150 कसोटी सामने खेळायचे आहेत.''
Ben Stokes Last ODI : टाळ्यांचा कडकडाटात बेन स्टोक्सने वन डे क्रिकेटचा निरोप घेतला, दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला
''ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्ती कधी घेणार, हे आताच सांगणे अवघड आहे. ट्वेंटी-20त 2 किंवा 3 षटकं टाकायची असतात. जेव्हा मी 35-36 वर्षांचा होईन तेव्हा मी आज घेतलेला निर्णय योग्य होता असे मला वाटेल, अशी आशा करतो,''असेही स्टोक्सने सांगितले. स्टोक्सने यावेळी क्रिकेटपटूंच्या अडचणींनाही वाचा फोडली. क्रिकेटचं वेळापत्रक एवढं व्यग्र आहे की प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 टक्के देणे सर्वांना शक्य नाही. खेळाडू म्हणजे कार नाही की भरलं पेट्रोल अन् पळवलं, असेही तो म्हणाला.
''संघासाठी योगदान देत रहावे, हे तुम्हाला सारखे वाटत असते आणि 100 टक्के योगदानाचा तुमचा प्रयत्न असतोच. पण, खेळाडू म्हणजे कार नाही, की तुम्ही भरलं पेट्रोल अन् पळवलं. वेळापत्रक एवढं व्यग्र आहे की प्रत्येक वेळी 100 टक्के देणे खेळाडूला शक्य होत नाही,''असे स्टोक्स म्हणाला.
Web Title: We're not cars you can fill with petrol: Ben Stokes opens up on his shocking decision to quit ODI cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.